सपूर्ण राज्यात दारुबंदी करा!-विरोधी पक्षनेते विखेंची मागणी: मात्र चंद्रपूर जिल्ातील दारुबंदीला विरोधमुंबई - मालवणीसारखे विषारी दारुकांड पुन्हा घडू नये म्हणून सरकारनेे संपूर्ण राज्यात दारुबंदी करावी, तसेच गृहखात्याचा कारभार सांभाळणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मात्र, विखे यांच्याच साखर कारखान्याने चंद्रपूर जिल्ातील दारुबंदी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मालवणीला भेट देऊन दारुबळींच्या कुटुंबियांचे सांत्वन करून आल्यानंतर विखे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर आरोप केले. ते म्हणाले, दारुकांडात शंभराहून अधिक बळी गेलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास वेळ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. हे हातभीचे सरकार असून दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली. विखे पुढे म्हणाले, मॅगी खाऊन कोणीही मेले नाही तरीही सरकारने मॅगीवर बंदी घातली; मात्र विषारी दारु पिऊन १०० हून अधिक बळी गेले असल्यामुळे सरकारने दारु बंदी करावी. गृह खाते सांभाळणारे फडणवीस आणि गृहराज्यमंत्री या दोन्ही नेत्यांच्या शहरातील तुरुंगातून कैदी पळून जाण्याचा विक्रम राज्यात पहिल्यांदा घडला आहे. उर्जा मंत्री वाळू माफियांना सोडून देण्याच्या सूचना करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली..............................पालिका आयुक्तांची भाषा बेजबाबदारीची!दारु पिऊन लोक मेले त्याला काय करणार? अशी बेजबाबदारीची भाषा मनपा आयुक्त अजेय मेहता यांनी आपल्याशी बोलताना वापरली असा आरोपही विखे यांनी केला. शिवाय, आयपीएल फेम ललित मोदी भेटीप्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिवंगत आर.आर. पाटील यांचे नाव घेतल्यामुळे मारिया यांचा राजीनामा घ्या, अशी मागणीही विखे यांनी केली...........................विखे कारखान्याची याचिका चंद्रपूर जिल्ात दारुबंदी लागू झाल्यानंतर अहमदनगर जिल्ातील लोणी-प्रवरा येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून तेथील दारुबंदीला विरोध केलेला आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यानंतर विखे कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.विखे यांच्या या दुतोंडी भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी जाहीरपणे टीका केलेली आहे.
राज्यात दारुबंदी करा-विखे (काल ज्यांनी वापरली नसेल त्यांच्यासाठी)
संपूर्ण राज्यात दारुबंदी करा!
By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:12+5:302015-06-25T23:51:12+5:30
संपूर्ण राज्यात दारुबंदी करा!
