Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दारू नको : सीडी साठी

दारू नको : सीडी साठी

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

Do not Drink: For CDs | दारू नको : सीडी साठी

दारू नको : सीडी साठी

>प्रजासत्ताकदिनी वाईन महोत्सव नको

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेश

पणजी : कांपाल येथील वाइन महोत्सव राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे अडचणीत आला आहे. २६ रोजी प्रजासत्ताकदिनी हा महोत्सव नकोच, असे लवादाने म्हटले आहे. गोवा किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी देऊ नये, असा आदेश देताना सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत.
कांपाल फुटबॉल मैदानावर वाईन महोत्सव आज सुरु झाला. हा महोत्सव चार दिवस चालणार असून २६ जानेवारी हा महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. लवादाच्या आदेशामुळे २६ रोजी महोत्सवाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तेथे सीआरझेड परवानगी आवश्यक असतानाही आयोजकांनी ती घेतलेली नाही, तसेच प्रजासत्ताकदिनी येथे वाइन विकली जाणार असल्याचे एका आरटीआय कार्यकर्त्याने हरित लवादाकडे धाव घेऊन निदर्शनास आणले होते. लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभाग खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किणगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर ही याचिका शुक्रवारी सुनावणीस आली असता, प्रजासत्ताकदिनी केवळ कांपाल येथेच नव्हे तर राज्यातील किनार्‍यांवर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी अशा महोत्सवांना परवानगी देऊ नये, असे लवादाने बजावले आहे. घटनेचा आदर राखून प्रजासत्ताकदिन साजरा केला जावा, असे लवादाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

चौकट

सरकारचे कान उपटले!
घटनेचा आदर करताना सर्व राज्यांनी सचोटी दाखवली पाहिजे. राज्य सरकार आपल्या मर्जीनुसार धोरणे बदलू शकत नाही, असे लवादाने म्हटले असून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेच्या नावाखालीही असले उद्योग करू नका, असे खडे बोल सुनावले आहेत. प्रजासत्ताकदिनी मद्यविक्रीला कोणत्याही सार्वजनिक यंत्रणेने परवाना देऊ नये तसेच हा दिवस कोरडा दिन जाहीर करावा, अशी सूचना केली आहे.

कोट

वाईन महोत्सव चालूच राहील. सरकारने कोरडा दिवस जाहीर केला तर प्रजासत्ताकदिनी महोत्सवाच्या ठिकाणी मद्यविक्री होणार नाही.
निखिल देसाई, व्यवस्थापकीय संचालक , पर्यटन विकास महांमडळ

Web Title: Do not Drink: For CDs