सलापूर: जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी सर्व कार्यालयातील अचानक तपासणी मोहीम सुरू केली असून, पहिला दणका दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयावर बसला आह़े प्रांताधिकारी र्शीमंत पाटोळे, तहसीलदार बाबुराव पवार यावेळी होत़े सर्व रजिस्टर तपासणी, सर्व बाबींच्या नोंदी घेणे, अनधिकृत कामे झाली असल्यास त्यावर कारवाया आदी बाबतीत ही तपासणी करण्यात आली़मंगळवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी मुंडे यांनी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, मुद्रांक जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांना दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिल़े त्यानंतर दुपारी तासभर स्वत: मुंडे यांनी कार्यालयाची तपासणी केली़ प्रत्येक कार्यालयात रेकॉर्ड व्यवस्थित असावे, कार्यालयात शिस्त यावी यासाठी सर्व कार्यालयांची तपासणी करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितल़ेचौकट़़़़कर्मचार्यांची बैठक़़़प्रत्येक कर्मचार्याने समाधानकारक कामे केली पाहिजेत़ वारंवार नागरिकांना चकरा मारायला लावू नयेत, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिल्या़ तासभर स्वत: कार्यालयाची तपासणी केल्यानंतर त्यांनी कर्मचार्यांची बैठक घेऊन काम प्रभावी आणि परिणामकारक करा, असे सांगितल़े
दक्षिण सोलापूर कार्यालयाची जिल्हाधिकार्यांकडून ‘झाडाझडती’
सोलापूर:
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:31+5:302014-12-02T23:30:31+5:30
सोलापूर:
