अोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सोमवारी मनपाच्यावतीने देण्यात आली.अकोला शहराला महान धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा सातत्याने खंडित झाल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री व सोमवारी घडल्याची माहिती आहे. वादळी वारा व पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची बाब समोर आली; परंतु याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असून, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले. शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वीज पुरवठा खंडित; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे
अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सोमवारी मनपाच्यावतीने देण्यात आली.
By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30