नपाणी : निपाणी हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारे शहर आहे. येथून आंतररराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते प्रवाशांचे केंद्रस्थान बनले आहे. या शहरातून बेळगाव-कोल्हापूर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना दिले. तसेच मिरज-यशवंतपूर रेल्वेसेवा दररोज सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.या मतदारसंघातील बहुतांश गावे सीमाभागाशी संबंधित आहेत. राज्याची दुसरी राजधानी म्हणून बेळगाव शहराचा उल्लेख केला जातो. निपाणी शहरापासून बेळगाव हे शहर ७० किलोमीटर अंतरावर, तर कोल्हापूर केवळ ४० किलोमीटर अंतरावर आहे. या भागातील नोकरदार, व्यावसायिक व औद्योगिक वसाहतींचे कर्मचारी दररोज बेळगाव-कोल्हापूरला ये-जा करीत असतात.सध्या कोल्हापूर-मिरज, रायबाग, घटप्रभा, गोकाकमार्गे बेळगावला रेल्वेसेवा उपलब्ध आहे. हे अंतर २०० किलोमीटर असून कोल्हापूर-बेळगाव ही रेल्वेसेवा निपाणीपासून सुरू केल्यास प्रवाशांसह रेल्वेखात्याना आर्थिक लाभ होऊ शकेल. शिवाय वेळेचीही बचत होते. बेळगाव-कोल्हापूर हे अंतर ११० किलोमीटर असून सातारा, कर्हाड, कोल्हापूर, निपाणी, हुबळीपर्यंत रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी सर्व्हे झाला आहे.बेळगाव जिल्ातील प्रवाशांना बंगलोरला ये-जा करण्यासाठी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस ही एकच रेल्वे असून ती कर्नाटकातील प्रवाशांना संजीवनी ठरली आहे. त्यामुळे मिरज-यशवंतपूर ही रेल्वेसेवा दररोज सुरू करून कोल्हापूर-बेळगाव ही नवीन सेवा सुरू करण्याची मागणी आमदार ज्वोल्ले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.यावेळी अण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार अशोक कत्ती, आमदार सी. टी. रवी, अभय मानवी, जयवंत भाटले, बसवप्रसाद ज्वोल्ले, आकाश शेी, आदी उपस्थित होते.-----------------फोटो २२ एनपीएन१फोटो ओळ : केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना निवेदन देताना आमदार शशिकला ज्वोल्ले. शेजारी अण्णासाहेब ज्वोल्ले व मान्यवर.
बेळगाव-कोल्हापूर रेल्वेसाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा आमदार ज्वोल्ले यांच्याकडून निवेदन
निपाणी : निपाणी हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारे शहर आहे. येथून आंतररराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते प्रवाशांचे केंद्रस्थान बनले आहे. या शहरातून बेळगाव-कोल्हापूर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना दिले. तसेच मिरज-यशवंतपूर रेल्वेसेवा दररोज सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:25+5:302014-08-22T23:32:25+5:30
निपाणी : निपाणी हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारे शहर आहे. येथून आंतररराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते प्रवाशांचे केंद्रस्थान बनले आहे. या शहरातून बेळगाव-कोल्हापूर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना दिले. तसेच मिरज-यशवंतपूर रेल्वेसेवा दररोज सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
