मुंबई : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच पूर्ण रेल्वे अर्थसंकल्पाने शेअर बाजारांची निराशा केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६१ अंकांनी कोसळून २८,७४६.६५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८३ अंकांनी कोसळून ८,७00 अंकांच्या खाली आला.
रेल्वे अर्थसंकल्प उत्साहवर्धक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेअर बाजारात नफा वसुलीला ऊत आला. आयटी, आरोग्य, भांडवली वस्तू आणि बँकिंग या क्षेत्रात नफेखोरी झाली.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २९,0५१.९0 अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर तो आणखी वर चढून २९,0६९.१३ अंकांवर गेला. यावेळी बाजारात जोरदार खरेदी सुरू होती. रेल्वे अर्थसंकल्पाची माहिती यायला सुरुवात झाल्यानंतर बाजार घसरणीला लागला. एका क्षणी सेन्सेक्स २८,६९३.८२ अंकांपर्यंत घसरला होता. सत्र अखेरीस तो २८,७४६.६५ अंकांवर बंद झाला. २६१.३४ अंक सेन्सेक्सने गमावले. ही घसरण 0.९0 टक्के आहे. ९ फेब्रुवारी २0१५ नंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली. ५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील सीएनएक्स निफ्टी ८३.४0 अंकांनी अथवा 0.९५ अंकांनी घसरून ८,६८३.८५ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी ५१६.0६ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १९.७0 कोटी रुपयांची खरेदी केली. शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली.युरोपीय बाजारात सकाळी तेजीचा कल दिसून आला. फ्रान्स आणि जर्मनीचे बाजार 0.१२ टक्के ते 0.१७ टक्के वर होते. ब्रिटनचा एफटीएसई 0.0३ टक्क्यांनी खाली चालला होता. आशियाई बाजारात तेजी दिसून आली. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँग येथील बाजार 0.२८ टक्के ते २.१५ टक्के वाढले. सिंगापूर आणि तैवान येथील बाजार मात्र 0.४३ टक्के ते 0.८३ टक्के घसरले.
रेल्वे बजेटमुळे शेअर बाजारांत निराशा
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच पूर्ण रेल्वे अर्थसंकल्पाने शेअर बाजारांची निराशा केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६१ अंकांनी कोसळून २
By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST2015-02-27T00:16:54+5:302015-02-27T00:16:54+5:30
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच पूर्ण रेल्वे अर्थसंकल्पाने शेअर बाजारांची निराशा केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६१ अंकांनी कोसळून २
