Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची डुबकी

सेन्सेक्सची डुबकी

जागतिक बाजारातील कमजोर कलाच्या पार्श्वभूमीवर नफा वसुलीला ऊत आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली

By admin | Updated: October 11, 2014 04:18 IST2014-10-11T04:18:49+5:302014-10-11T04:18:49+5:30

जागतिक बाजारातील कमजोर कलाच्या पार्श्वभूमीवर नफा वसुलीला ऊत आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली

Dipping of Sensex | सेन्सेक्सची डुबकी

सेन्सेक्सची डुबकी

मुंबई : जागतिक बाजारातील कमजोर कलाच्या पार्श्वभूमीवर नफा वसुलीला ऊत आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३४0 अंकांनी कोसळला. ही दोन आठवड्यांतील सर्वात मोठी घसरण ठरली आहे.
युरो क्षेत्रातील आर्थिक वाढीबाबत व्यक्त होत असलेली चिंता आणि महागाईच्या घसरणीची जोखीम या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केली. या पडझडीत आयटी क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिसचा शेअर मात्र ६.६८ टक्क्यांनी वर चढला. ३0 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसचा शुद्ध लाभ २८.६ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे कंपनीचा शेअर तेजीत
आला.
३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स ३३९.९0 अंक अथवा १.२८ टक्क्यांनी घसरून २६,२९७.२८ अंकांवर बंद झाला. आयटी वगळता सर्व वर्गातील निर्देशांक चार टक्क्यांपर्यंत घसरले. आदल्या दिवशी सेन्सेक्स ३९0.४९ अंकांनी वर चढला होता. सलग तिसऱ्या सप्ताहात सेन्सेक्समध्ये घसरण झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १00.६0 अंकांनी म्हणजेच १.२६ टक्क्यांनी खाली येऊन ७,८५९.९५ अंकांवर बंद झाला. व्यवसायादरम्यान तो ७,८४८.४५ अंकांपर्यंत घसरला होता. आदल्या दिवशी कमावलेला सर्व लाभ निफ्टीने गमावला आहे.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २३ कंपन्या नुकसानीत राहिल्या. टाटा मोटर्स, हिंदालको, सेसा स्टरलाईट, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांना फटका बसला.
विभिन्न वर्गांपैकी धातू क्षेत्राला सर्वात ४.११ टक्क्यांचा फटका बसला. वाहन क्षेत्राला २.७८ टक्के, एफएमसीजी २.५६ टक्के आणि बँकिंग क्षेत्राला १.८0 टक्के फटका बसला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या वर्गात अनुक्रमे १.३८ टक्के ते १.१२ टक्के घट झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Dipping of Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.