Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुष्काळी मंगळवेढय़ाचा कलंक पुसणार: दिलीप धोत्रे (प्रादेशिकसाठी बातमी)

दुष्काळी मंगळवेढय़ाचा कलंक पुसणार: दिलीप धोत्रे (प्रादेशिकसाठी बातमी)

मंगळवेढा: आतापर्यंत मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र अद्यापपर्यंत काहीच फायदा मिळाला नाही. भविष्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यात हरितक्रांती घडविणार असल्याची हमी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी दिली.

By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:34+5:302014-08-28T23:09:34+5:30

मंगळवेढा: आतापर्यंत मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र अद्यापपर्यंत काहीच फायदा मिळाला नाही. भविष्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यात हरितक्रांती घडविणार असल्याची हमी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी दिली.

Dilip Dhotre (Regional News) | दुष्काळी मंगळवेढय़ाचा कलंक पुसणार: दिलीप धोत्रे (प्रादेशिकसाठी बातमी)

दुष्काळी मंगळवेढय़ाचा कलंक पुसणार: दिलीप धोत्रे (प्रादेशिकसाठी बातमी)

गळवेढा: आतापर्यंत मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र अद्यापपर्यंत काहीच फायदा मिळाला नाही. भविष्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यात हरितक्रांती घडविणार असल्याची हमी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी दिली.
मंगळवेढय़ात झालेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मंगळवेढा तालुका दामाजीपंतांचा ज्वारीचा कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र येथील ज्वारीला जागतिक बाजारपेठ मिळवून देता आली नाही. मात्र मंगळवेढय़ाचा विकास करण्याबरोबरच ज्वारीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, तालुक्यात रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे धोत्रे यांनी यावेळी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील युवक, महिला व बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध प्रकल्प उभे करून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देणार असून, र्शमाला प्रतिष्ठेबरोबरच योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. केवळ पाण्याच्या नावावर आपल्याला राजकारण करायचे नाही. जनतेला हव्या असलेल्या सुविधांचा विचार करून त्याच्या पूर्ततेसाठी माझी लढाई असणार आहे. केवळ आश्वासने, हमी, ग्वाही देऊन समस्या सुटत नसतात. त्यासाठी नियोजन करून त्याद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी विधानभवनात जनतेसाठी प्रसंगी भांडण्याचीही माझी तयारी आहे. यासाठी जनतेला सोबत घेऊन मी जनचळवळ उभी करून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याला न्याय मिळवून देणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष जयवंत माने, उपाध्यक्ष बंडू शिंदे, तालुका संघटक शशिकांत पाटील, चंद्रकांत पवार, शहराध्यक्ष दत्ता भोसले, अझरुद्दीन शेख, संजय नागणे, मोहन काकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Dilip Dhotre (Regional News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.