नवी दिल्ली : सरकारचा सुवर्ण बचत योजना सुरू करण्याचा बेत असतानाच जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूसीजी) भारतीय प्रमाणचिन्ह (हॉलमार्क) असलेल्या सोन्याच्या दागदागिन्यांच्या शुद्धतेत फरक असल्याचा अहवाल जारी केला आहे. यामुळे हौसेसाठी म्हणा की गुंतवणुकीसाठी, सोन्याचे दागदागिने खरेदी करणाऱ्यांना काहीसा हादरा बसू शकतो.
जागतिक सुवर्ण परिषदेने भारतातील गुणवत्तेसंदर्भातील मापदंडात सुधारणा करण्याच्या गरजेवरही भर दिला आहे.
प्रमाण चिन्ह प्रणालीतील सुधारणेमुळे सुवर्ण बचत योजना यशस्वी होईलच, त्याशिवाय भारतातील सोने निर्यातीचा आकडा ८ अब्ज डॉलरवरून पुढील पाच वर्षांत ४० अब्ज डॉलरवर जाईल, असे या परिषदेने अहवालात म्हटले आहे.
भारतात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाणीकरण (हॉलमार्किंग) करणे बंधनकारक नाही. तथािप, हे प्रमाणीकरण म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण आहे. ग्राहक कल्याण मंत्रालयानुसार भारतीय मानक विभाग (बीआयएस) हॉलमार्किंगसाठी प्राधिकृत आहे. हॉलमार्किंग करणे बंधनकारक नसले तरी सध्या ३० टक्के दागदागिन्यांचे प्रमाणीकरण केले जाते; परंतु हॉलमार्किंग करणाऱ्या काही केंद्रांची गुणवत्ता आणि विश्वसनीयतेबाबत साशंकता आहे.
गुणवत्ता नियंत्रणातील कमकुवतपणा आणि बीएसआयकडे संसाधनांचा अभाव असल्याने हॉलमार्किंग असलेल्या दागदागिन्यांच्या शुद्धतेत फरक आढळतो. २००० मध्ये बीएसआय हॉलमार्किंग सुरू करण्यात आले.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या भारतीय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले की, भारतात सोन्याचे दागदागिन्यांचे हॉलमार्किंग करणे बंधनकारक नाही. ग्राहक जागृतीपुरतीच ही बाब मर्यादित आहे. व्यापारीसुद्धा यासाठी उत्सुक नसतात. विशेष म्हणजे एकाच दुकानात हॉलमार्क आणि बिगर हॉलमार्कचे सोने विकले जाते.
सोने २00 रुपयांनी उतरले; चांदी १५0 रुपयांनी स्वस्त
जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी सलग तिसऱ्या दिवशी घसरले. राजधानी दिल्लीत सोने २00 रुपयांनी घसरून २५,0९0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी १५0 रुपयांनी घसरून ३४,0५0 रुपये किलो झाली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, जुलैमध्ये सोने दोन वर्षांतील सर्वांत मोठ्या मासिक घसरणीकडे वाटचाल करताना दिसून येत आहे.
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह २00६ नंतर प्रथमच व्याजदरांत वाढ करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा दबाव सोन्या-चांदीच्या भावावर दिसून येत आहे. जागतिक बाजारातही दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या.
सिंगापूर येथील बाजारात सोने १.१ टक्के वाढून १,0८४.५१ डॉलर प्रति औंस झाले. चांदी १ टक्क्यांनी घसरून १४.६६ डॉलर प्रति औंस झाली.
राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी २00 रुपयांनी घटून अनुक्रमे २५,0९0 रुपये आणि २४,९४0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाली.
गेल्या दोन दिवसांत सोने २00 रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २२,२00 रुपये असा स्थिर राहिला.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च संस्थेने म्हटले की, अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविल्यास सोने २0,५00 रुपयांपर्यंत खाली येऊ शकेल.
पाच वर्षांपूर्वी सोने या पातळीवर होते. तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी घसरून ३४,0५0 रुपये किलो झाला.
हॉलमार्कच्या सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धतेतही फरक
सरकारचा सुवर्ण बचत योजना सुरू करण्याचा बेत असतानाच जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूसीजी) भारतीय प्रमाणचिन्ह (हॉलमार्क) असलेल्या सोन्याच्या दागदागिन्यांच्या शुद्धतेत फरक
By admin | Updated: July 31, 2015 02:02 IST2015-07-31T02:02:05+5:302015-07-31T02:02:05+5:30
सरकारचा सुवर्ण बचत योजना सुरू करण्याचा बेत असतानाच जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूसीजी) भारतीय प्रमाणचिन्ह (हॉलमार्क) असलेल्या सोन्याच्या दागदागिन्यांच्या शुद्धतेत फरक
