नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २७ महिन्यांचा निच्चांक गाठल्याच्या पार्श्वभूमीवर आता तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेट्रोल जरी सरकारी नियंत्रणातून मुक्त असले तरी डिझेल अद्यापही अंशत: नियंत्रण मुक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांत निवडणूका असल्याने त्यानंतर घोषणा करण्यात येईल, असे संकेत सुत्रांनी दिले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेता डिझेलच्या दरात प्रती लिटर अडीच रुपयांपर्यंत कपात होऊ शकेल तर पेट्रोलच्या दरात किमान एक रुपयांपर्यंत कपात होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत
आहे.
या पार्श्वभूमीवर डिझेलच्या दरात कपात करतानाच डिझेलच्या सरकारी नियंत्रणातूम मुक्त करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार?
कच्च्या तेलाच्या किमतींनी २७ महिन्यांचा निच्चांक गाठल्याच्या पार्श्वभूमीवर आता तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची तयारी
By admin | Updated: October 9, 2014 03:37 IST2014-10-09T03:37:20+5:302014-10-09T03:37:20+5:30
कच्च्या तेलाच्या किमतींनी २७ महिन्यांचा निच्चांक गाठल्याच्या पार्श्वभूमीवर आता तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची तयारी
