Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल तीन तर डिझेल दोन रुपयांनी महागले

पेट्रोल तीन तर डिझेल दोन रुपयांनी महागले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचाही भडका उडणार आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ३ रुपये ७ पैसे आणि डिझेलच्या

By admin | Updated: March 17, 2016 04:07 IST2016-03-17T04:07:10+5:302016-03-17T04:07:10+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचाही भडका उडणार आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ३ रुपये ७ पैसे आणि डिझेलच्या

Diesel by two paise and diesel by two rupees | पेट्रोल तीन तर डिझेल दोन रुपयांनी महागले

पेट्रोल तीन तर डिझेल दोन रुपयांनी महागले

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचाही भडका उडणार आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ३ रुपये ७ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपया ९० पैशांची वाढ केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमालीचे घसरूनही १६ फेब्रुवारी २०१५ पासून डिझेलच्या दरात प्रति लीटर एकूण ३.६५ रुपयांची वाढ झाली आहे. एक मार्च रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ३.०२ रुपयांनी कपात करताना डिझेलच्या दरात १.४७ रुपयांची वाढ केली होती. नोव्हेंबरपासून पाच वेळा पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढविल्याने पेट्रोलचे दर प्रति लीटर ४.०२ रुपयांनी, तर डिझेल ६.९७ रुपयांनी महागले. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या १ व १६ तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारातील दर व विदेश चलन विनिमय दरातील चढ-उताराच्या आधारे नवे दर ठरवत असतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Diesel by two paise and diesel by two rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.