Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > धामणा तीन दिवसांपासून अंधारात!

धामणा तीन दिवसांपासून अंधारात!

विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:27+5:302014-08-31T22:51:27+5:30

विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष

Dhamaana for three days in the dark! | धामणा तीन दिवसांपासून अंधारात!

धामणा तीन दिवसांपासून अंधारात!

द्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष
बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील गायगाव उपकेंद्रावरू न गलथान कारभार सुरू असल्यामुळे या फिडरवरील गावकर्‍यांना नेहमी खंडित विजेचा सामना करावा लागत आहे. नवीन धामणा गावात तीन दिवसांपासून वीज खंडित असून, या परिसरातील गावांमध्ये पंधरा मिनिटाच्या अंतराने वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
धामणा, खंडाळा, हातरू ण, मालवाडा, मोरझडी, सोनाळा या गावांना गायगाव फिडरवरू न वीज पुरवठा होत आहे. गावठाण फिडरचे काम निकृष्ट झाल्यामुळे दररोज तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे वीज खंडित होत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन धामणा येथे नवीन फिडरवरू न वीज पुरवठा केला जातो. दररोज वीज जात असल्याने गावकर्‍यांची कुचंबणा होत आहे. तीन-तीन दिवस वीज खंडित राहत असल्यावरही अधिकारी या गावाकडे फिरकतही नाहीत. लोकप्रतिनिधींनीसुद्धा या समस्येचे काहीच देणे-घेणे नाही. केवळ तीन ते चार दिवस वगळता कधीही २४ तास नियमित विद्युत पुरवठा करण्यात आला नसल्याचे नागरिकांचे आरोप आहेत. संपूर्ण वर्षभर विद्युतचा त्रास सहन करावा लागत आहे; परंतु पावसाळ्याच्या दिवसांत विद्युत पुरवठा खंडित होणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे असल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत. पावसाळ्यात घरी व परिसरातही घाणीचे वातावरण असते. विषारी किडे व डासांचा प्रकोप आदी समस्यांचे निवारण करण्याची सोय घरी उपलब्ध नाही. विविध प्रकारच्या आजारांना काही प्रमाणात प्रतिबंध करण्यासाठी विजेची गरज असते. विजेअभावी पाच मिनिटेही राहता येत नसताना ग्रामीण भागातील नागरिक कसे जीवन जगत असतील, हे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी समजून घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. गावकर्‍यांची तक्रार असतानादेखील अधिकारी काहीच उपाययोजना करीत नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे.
कोट़.

Web Title: Dhamaana for three days in the dark!