Lokmat Money > बिझनेस न्यूज > विकास कामांना अधिकार्‍यांचाच खोळंबा! नगरसेवकांनी वाचला उपायुक्तांचा पाढा नगर विकास राज्यमंत्र्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर

विकास कामांना अधिकार्‍यांचाच खोळंबा! नगरसेवकांनी वाचला उपायुक्तांचा पाढा नगर विकास राज्यमंत्र्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर

अकोला: मनपा अधिकार्‍यांना कोणतीही समस्या सांगितल्यास त्याचे निराकरण न करता, समस्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रामुख्याने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर नगरसेवकांचा सतत अपमान करतात. सूडभावनेतून वागणार्‍या अधिकार्‍यांमुळे विकास कामांना खिळ बसली असून, उपायुक्त चिंचोलीकर यांची बदली आवश्यक असल्याचा पाढा पुन्हा एकदा भाजपच्या नगरसेवकांनी नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्यासमोर वाचला. डॉ.पाटील यांच्या सूचनेवरून शनिवारी पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक पार पडली.

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:21+5:302014-12-20T22:27:21+5:30

अकोला: मनपा अधिकार्‍यांना कोणतीही समस्या सांगितल्यास त्याचे निराकरण न करता, समस्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रामुख्याने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर नगरसेवकांचा सतत अपमान करतात. सूडभावनेतून वागणार्‍या अधिकार्‍यांमुळे विकास कामांना खिळ बसली असून, उपायुक्त चिंचोलीकर यांची बदली आवश्यक असल्याचा पाढा पुन्हा एकदा भाजपच्या नगरसेवकांनी नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्यासमोर वाचला. डॉ.पाटील यांच्या सूचनेवरून शनिवारी पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक पार पडली.

Development workers are detained for work! The meeting was held by the municipal corporators | विकास कामांना अधिकार्‍यांचाच खोळंबा! नगरसेवकांनी वाचला उपायुक्तांचा पाढा नगर विकास राज्यमंत्र्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर

विकास कामांना अधिकार्‍यांचाच खोळंबा! नगरसेवकांनी वाचला उपायुक्तांचा पाढा नगर विकास राज्यमंत्र्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर

ोला: मनपा अधिकार्‍यांना कोणतीही समस्या सांगितल्यास त्याचे निराकरण न करता, समस्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रामुख्याने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर नगरसेवकांचा सतत अपमान करतात. सूडभावनेतून वागणार्‍या अधिकार्‍यांमुळे विकास कामांना खिळ बसली असून, उपायुक्त चिंचोलीकर यांची बदली आवश्यक असल्याचा पाढा पुन्हा एकदा भाजपच्या नगरसेवकांनी नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्यासमोर वाचला. डॉ.पाटील यांच्या सूचनेवरून शनिवारी पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक पार पडली.
नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील शनिवारी शहरात दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या समस्या जाणून घेण्यासाठी पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. रखडलेल्या योजना व विकास कामांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना डॉ.रणजित पाटील यांनी नगरसेवकांना केल्या. यावर मनपातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक समस्यांचे निराकरण करीत नसल्याचा मुद्दा नगरसेविका सारिका जयस्वाल यांनी उपस्थित केला. विकास कामे तर सोडाच, साध्या मूलभूत समस्यांबद्दल उपायुक्त चिंचोलीकर यांना सूचना केल्यावर दखल घेत नाहीत. काही ठरावीक नगरसेवकांचा ते सतत अपमान करून त्यांच्या प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असे मुद्दे यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केले. प्रभागातील पथदिवे, नाल्या, पाण्याची समस्या निकाली निघत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मनपापासून ते केंद्रापर्यंत भाजपची सत्ता असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशास्थितीत उपायुक्त चिंचोलीकर कामे करीत नसतील तर त्यांची आम्हाला गरज नाही. त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. यावर नगर विकास मंत्र्यांनी सक्षम अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नरत असून, मनमानी करणार्‍या अधिकार्‍यांना संरक्षण देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Development workers are detained for work! The meeting was held by the municipal corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.