अमरावतीत डेंग्यूने बालिका दगावली
By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:53+5:302014-09-29T21:46:53+5:30

अमरावतीत डेंग्यूने बालिका दगावली
>अंजनगावसुर्जी (अमरावती) : सुर्जी भागातील बारगणपुरा येथील बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने अमरावती येथील खासगी रूग्णालयात रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक बारगणपुरा भागातील संजय महादेव थोरात यांची मुलगी श्रुती हिला सुर्जीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला परतवाडा येथे नेण्याचा सल्ला दिला. येथील रूग्णालयात तिच्या रक्ताचे नमूने घेतले असता तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर श्रुतीला अमरावती येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)