लतूर : जागेवर तक्रारींचा निकाल लागावा म्हणून जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाची परंपरा सुरू आहे. मात्र हा नुसताच फार्स असून, तक्रारींचा जागेवर निपटारा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात एकूण ४० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ६ तक्रारींचा निकाल लावण्यात आला. अन्य ३४ तक्रारी संबंधित खाते प्रमुखांकडे वर्ग आहेत. मग लोकशाही दिन कशाला? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या अनेक महिन्यांच्या लोकशाही दिनाची अशीच स्थिती आहे. त्यामुळे आता तक्रारींचा ओघही कमी झाला आहे. संबंधित खाते प्रमुखांकडे तक्रार करून उपयोग होत नाही. जिल्हाधिकार्यांच्या लोकशाही दिनातही न्याय मिळत नाही. मग तक्रार कशाला? असा तक्रारकर्त्यांचा समज होत आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात एकूण ४० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २४ तक्रारी जुन्याच होत्या. या २४ मधील ६ तक्रारींचा निकाल लागला. ४० मधील १६ प्रथम आलेल्या तक्रारी आहेत. त्यात महसूलच्या सर्वाधिक १०, पोलिस १, सार्वजनिक बांधकाम १, अधीक्षक भूमिअभिलेख १, महावितरण १ आणि अन्य विभागाचे २ अशा १६ तक्रारींचा समावेश आहे. यातील एकाही तक्रारीचा निकाल सोमवारच्या लोकशाही दिनात लागू शकला नाही. संबंधित खाते प्रमुखांकडे ते वर्ग करण्यात आले आहेत. जुन्या २४ पैकी ६ तक्रारींचा या लोकशाही दिनात निकाल लावण्यात आला आहे. जिल्हाभरातील सर्व खाते प्रमुखांना बोलावून लोकशाही दिन घेतला जातो. या खाते प्रमुखांकडे संबंधित तक्रारकर्त्यांची तक्रार यापूर्वीच दिलेली असते. तरीही लोकशाही दिनात त्यावर सकारात्मक चर्चा होत नाही आणि तक्रारकर्त्यांना न्याय मिळत नाही, अशी परिस्थिती लोकशाही दिनाची आहे. मग या लोकशाही दिनाचा फार्स कशाला, असाही संतप्त सवाल तक्रारकर्त्यांतून होतो. तक्रारकर्त्यांची नाराजी...सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात महसूल विभागात १० तक्रारी गुदरल्या. संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपस्थित असूनही त्या तक्रारींचा अंतिम निकाल लागू शकला नाही. तहसीलदारांकडे या तक्रारी वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्यांतून नाराजीचा सूर उमटला.
लोकशाही दिनाचा नुसताच फार्स ! महसूलवर रोष असूनही तक्रारींचा निकाल नाही
लातूर : जागेवर तक्रारींचा निकाल लागावा म्हणून जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाची परंपरा सुरू आहे. मात्र हा नुसताच फार्स असून, तक्रारींचा जागेवर निपटारा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात एकूण ४० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ६ तक्रारींचा निकाल लावण्यात आला. अन्य ३४ तक्रारी संबंधित खाते प्रमुखांकडे वर्ग आहेत. मग लोकशाही दिन कशाला? असा सवाल उपस्थित होत आहे.
By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST2014-09-01T20:01:14+5:302014-09-01T20:01:14+5:30
लातूर : जागेवर तक्रारींचा निकाल लागावा म्हणून जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाची परंपरा सुरू आहे. मात्र हा नुसताच फार्स असून, तक्रारींचा जागेवर निपटारा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात एकूण ४० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ६ तक्रारींचा निकाल लावण्यात आला. अन्य ३४ तक्रारी संबंधित खाते प्रमुखांकडे वर्ग आहेत. मग लोकशाही दिन कशाला? असा सवाल उपस्थित होत आहे.
