शणवा : शेतकर्यांनी पेरणी केलेला भात व नागलीची रोपे अपुर्या पावसामुळे कडक उन्हात सुकली आहेत. त्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून कर्जबाजारी शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज मंजूर करून आत्महत्यांपासून शेतकर्यांना रोखावे, अशी मागणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे केली आहे.शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या वर्षी तालुक्यात जून महिनाअखेर फक्त ८२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ३० जूनपर्यंत ३०० मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी उशिरा व अपुर्या झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी पेरणी केलेली भात व नागलीची रोपे सुकल्याने शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. पेरणीसाठी बाजारातील महागडी बियाणे खरेदी करावी लागणार असल्याने कर्जबाजारी शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकर्यांच्या आत्महत्येसारख्या घटना टाळण्यासाठी दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकर्यांना विशेष पॅकेज मंजूर करावे, असे तिवरे यांनी म्हटले आहे........................................वार्ताहर - रवींद्र सोनावणे
दुष्काळजन्य परिस्थिती निवारण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी
शेणवा : शेतकर्यांनी पेरणी केलेला भात व नागलीची रोपे अपुर्या पावसामुळे कडक उन्हात सुकली आहेत. त्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून कर्जबाजारी शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज मंजूर करून आत्महत्यांपासून शेतकर्यांना रोखावे, अशी मागणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे केली आहे.
By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST2014-07-04T21:45:11+5:302014-07-04T21:45:11+5:30