Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी घरे देण्याची मागणी

स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी घरे देण्याची मागणी

नियोजित स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी व सर्वसमावेशक घरे हवीत यासाठी सरकारला निश्चित उपाययोजना कराव्या लागतील, असे डन अँड ब्रॅडस्टरीटच्या अहवालात म्हटले आहे.

By admin | Updated: November 16, 2015 00:04 IST2015-11-16T00:04:08+5:302015-11-16T00:04:08+5:30

नियोजित स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी व सर्वसमावेशक घरे हवीत यासाठी सरकारला निश्चित उपाययोजना कराव्या लागतील, असे डन अँड ब्रॅडस्टरीटच्या अहवालात म्हटले आहे.

Demand for affordable homes in smart cities | स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी घरे देण्याची मागणी

स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी घरे देण्याची मागणी

मुंबई : नियोजित स्मार्ट शहरांमध्ये परवडणारी व सर्वसमावेशक घरे हवीत यासाठी सरकारला निश्चित उपाययोजना कराव्या लागतील, असे डन अँड ब्रॅडस्टरीटच्या अहवालात म्हटले आहे.
या आधुनिक शहरांच्या जवळ भविष्यात विस्तारासाठी योजनाही असली पाहिजे. मोदी सरकारची स्मार्ट शहरांच्या योजनेचे यश हे तेथे पायाभूत सोयींचे नियोजन आणि त्यासाठीची तरतूद यावर अवलंबून असेल, असे त्यात म्हटले.
जुन्या मालमत्तांचा पुनर्विकास आणि उपनगरांचा विकास यामुळे महानगरांवरील पायाभूत सुविधांवर पडत असलेला ताण कमी करण्यासाठी या नियोजनाचा उपयोग होऊ
शकेल.
निवासी घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला निश्चित अशी पावले उचलावी लागतील. सरकारने १०० स्मार्ट सिटींची घोषणा आधीच केलेली आहे.

Web Title: Demand for affordable homes in smart cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.