नवी दिल्ली : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक संमत होण्यास विलंब होणार असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर होऊ नये यासाठी सरकार काळजी घेईल. उद्योगांच्या फायद्यासाठी ‘अन्य मार्ग’ शोधले जातील, असे केंद्रीय बीजमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, जीएसटी नजीकच्या काळात संसदेत संमत होणार नाही, हे जवळपास अटळ आहे. त्याचा परिणाम उद्योगावर होऊ नये यासाठी सरकार अन्य मार्ग शोधणार आहे. जीएसटी विधेयक संमत न होण्याचे परिणाम उद्योगावर होऊ नयेत यासाठी सरकार आवश्यक ती काळजी निश्चित घेईल; मात्र या संदेशात पर्यायी मार्ग काय असतील, याचा खुलासा केला नाही.
जीएसटी प्रणाली एप्रिल २०१६ पासून लागू होईल, अशी आशा वित्त मंत्रालयाने व्यक्त केली होती.
जीएसटीला विलंब; उद्योगांसाठी अन्य मार्ग शोधणार
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक संमत होण्यास विलंब होणार असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर होऊ नये यासाठी सरकार काळजी घेईल.
By admin | Updated: December 20, 2015 22:40 IST2015-12-20T22:40:32+5:302015-12-20T22:40:32+5:30
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक संमत होण्यास विलंब होणार असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर होऊ नये यासाठी सरकार काळजी घेईल.
