दुर्गापूर (चंद्रपूर) : चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात निर्माणाधीन संच कार्यान्वित होण्याचा अवधी संपला असून दिलेल्या मुदतीपेक्षा तीन वर्षे अधिक लोटली आहेत; मात्र अद्याप संचाचे काम पूर्ण झाले नाही. कंत्राटी कंपन्यांनी हे संच २०१५ मध्ये सुरू होतील, अशी शाश्वती दिली आहे; मात्र बांधकामाच्या प्रगतीवरून संच कार्यान्वित करणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. या कंपन्यांच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीचा जबर फटका राज्यातील नागरिकांना बसत आहे.
चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात ५०० मेगावॅटच्या दोन नव्या संचांचे बांधकाम सुरू आहे. येथे चेन्नईतील मे. बीजीआर बीओपीचे (स्थापत्य संबंधित सर्व कामे) काम करीत असून ते एक हजार ६३१ कोटी ८० लक्ष रुपयांचे आहे, तर न्यू दिल्लीतील मे. भेल ही बीटीजी (बॉयलर, टर्बाईन, जनरेटर) चे काम करीत आहे. या कामाचे कंत्राट दोन हजार ६६८ कोटी ६८ लक्ष रुपयांचे आहे. बीजीआर या कंपनीने १२ जून २००९ पासून कामाला सुरुवात केली. प्रारंभापासून मंद गतीने कामास सुरुवात झाली. कंपनीने बॉयलर फाऊंडेशन, एल.एच.एस. बंकर, डेक कॉस्टिंग, टी.जी. फ्लोअर्स कास्टिंग, बीओपी इनपुटस् अशी महत्त्वपूर्ण कामे करारनाम्यानुसार पूर्ण करण्यास विलंब लावला. परिणामी भेलद्वारे करण्यात येणाऱ्या बॉयलर इरेक्शन, ड्रम लिफ्टिंग, कंडेन्सर इरेक्शन, टी.जी. इरेक्शन, हायड्रॉलिक टेस्ट, बॉयलर लाईट अपसाठी दोन्ही कंपन्यांकडून आजघडीस दोन-तीन वर्षे विलंब झाला आहे.
याशिवाय दोन्ही संचांचे स्टीन ब्लोइंग, सिन्क्रोनायझेशन, कोल फायरिंग, फुल लोड, ट्रायल आॅपरेशनसारखी तांत्रिक कामे अद्यापही शिल्लक आहेत. सदर कामे २०१५ मध्ये पूर्ण करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यापूर्वी ३० डिसेंबर २०१३ ला संच कार्यान्वित होण्याची शाश्वती दिली होती. ती फोल ठरली. दोन्ही कंपन्या केवळ वेळकाढू धोरण अवलंबत आहे. यांच्याकडून काम करवून घेणारे महानिर्मितीचे अधिकारीही अपयशी ठरत आहेत. (वार्ताहर)
वीज संचाच्या कामाला अडीच वर्षांचा विलंब
चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात निर्माणाधीन संच कार्यान्वित होण्याचा अवधी संपला असून दिलेल्या मुदतीपेक्षा तीन वर्षे अधिक लोटली आहेत;
By admin | Updated: November 6, 2014 02:40 IST2014-11-06T02:40:57+5:302014-11-06T02:40:57+5:30
चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात निर्माणाधीन संच कार्यान्वित होण्याचा अवधी संपला असून दिलेल्या मुदतीपेक्षा तीन वर्षे अधिक लोटली आहेत;
