सत उपकेंद्र परिचारिकांविना : वैद्यकीय अधिकारीही अनुपस्थित रोहिदास पाटीलअनगाव - भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणार्या सात उपकेंद्रांत परिचारिकांच्या नेमणुका होऊनही त्या तिथे राहत नसल्याने रुग्णांना उपकेंद्र बंद पाहून उपचाराविना परतावे लागत आहे. त्यामुळे सुमारे ५३ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न रामभरोसे आहे. ऐन पावसाळ्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पारिचारिकांबरोबरच मुख्य वैद्यकीय अधिकारीही प्राथमिक आरोग्य केंद्रात राहत नसल्याचे उघडकीस आले आहे.ठाणे जिल्हा परिषद, भिवंडी पंचायत समिती आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेला चिंबीपाडा हा संपूर्ण आदिवासी विभाग आहे. तेथील कांबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ६,०९२ लोकसंख्या आहे. लाखिवलीत १०००, खडकी नंबर १मध्ये १४६२, खडकी नं.२ मध्ये ११६५, धामणेमध्ये २१९२, कुर्हामध्ये २०२०, टेंबिवलीत ४२६६, काटईत ३५००० इतकी लोकसंख्या आहे. या गावपाड्यांतील रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याची जबाबदारी या उपकेंद्रातील परिचारिकांवर आहे. मात्र, परिचारिकाच उपकेंद्रात राहत नाहीत. त्यामुळे येणार्या रुग्णांवर उपचार कुणी करायचे, असा प्रश्न रहिवाशां बरोबरच जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य व जि.प. सदस्य गोविंद वेंडगे यांनी वैद्यकीय अधिकार्यांना विचारला होता, मात्र दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे............वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काकडेंसह परिचारिकाही उपकेंद्रात राहत नाहीत, हे खरे आहे. त्यांना नोटीस बजावून वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांचे घरभाडे व वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. कारवाईकरिता वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला आहे.- डॉ. करुणा जुईकर, भिवंडीपंचायत समितीचे गटविकास अधिकारी....चिंबीपाडा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यासह परिचारिका राहत नाहीत. त्यांना गटविकास अधिकार्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत, हे खरे आहे. तालुका आरोग्य अधिकार्यांनीही कारवाई करण्यास सांगितले आहे. मी प्रत्यक्ष भेटी देऊन कारवाई करणार आहे.- डी. एस. सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
चिंबीपाड्यात आरोग्य सेवेचा बोजवारा
सात उपकेंद्र परिचारिकांविना : वैद्यकीय अधिकारीही अनुपस्थित
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:16+5:302014-09-11T22:31:16+5:30
सात उपकेंद्र परिचारिकांविना : वैद्यकीय अधिकारीही अनुपस्थित
