Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावकारांचे व्याजदर निश्चित

सावकारांचे व्याजदर निश्चित

शासनाने अधिकृत सावकारांकडून वितरित होणाऱ्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले असून बिगर शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्याजदर ठरविण्यात आले आहेत.

By admin | Updated: May 27, 2015 01:56 IST2015-05-27T01:56:52+5:302015-05-27T01:56:52+5:30

शासनाने अधिकृत सावकारांकडून वितरित होणाऱ्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले असून बिगर शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्याजदर ठरविण्यात आले आहेत.

Definition of interest rates of lenders | सावकारांचे व्याजदर निश्चित

सावकारांचे व्याजदर निश्चित

यवतमाळ : शासनाने अधिकृत सावकारांकडून वितरित होणाऱ्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले असून बिगर शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्याजदर ठरविण्यात आले आहेत. निर्धारित दरापेक्षा अधिक व्याजदर आकारल्यास परवानाधारक सावकारावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई सावकारी अधिनियम १९४६ हा कायदा निरसित करण्यात आला आहे. आता त्याऐवजी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ लागू करण्यात आला आहे. अवैध सावकारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे, अवैध सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे आदींबाबत यात स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना त्वरित व कमी व्याजदरात कर्जपुरवठा होण्यासाठी सावकारी व्यवसायासाठी परवाना देण्याची तरतूद नवीन अधिनियमातही करण्यात आली आहे. त्या अन्वये अधिकृत सावकार शेतकरी व बिगर शेतकऱ्यांना कर्ज वितरित करू शकतो. तारण कर्जावर बिगर शेतकऱ्यांना १५ टक्के व्याज दर तर बिगर तारण कर्जावर १८ टक्के व्याज दर आकारले जाणार आहे.
तर शेतकऱ्यांसाठी तारण कर्जाला नऊ टक्के आणि बिन तारण कर्जावर १२ टक्के व्याज दर आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परवानाधारक सावकार जास्तीचे व्याज घेत असल्यास परवानाधारक सावकारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवार २६ मे रोजी एक पत्र जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

च्महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील कलम १८ नुसार अवैध सावकारीच्या ओघात सावकाराने संपादित केलेली स्थावर मालमत्ता मूळ शेतकऱ्यांंना परत करण्याचे अधिकार जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.
च्अवैध सावकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: Definition of interest rates of lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.