नवी दिल्ली : देशाची इंजिनिअरिंग निर्यात गेल्या महिन्यात १६ टक्क्यांनी खाली येऊन ५.८ अब्ज डॉलरची झाली. डिसेंबर २०१४ मध्ये ही निर्यात ६.९ अब्ज डॉलरची होती. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशाची एकूण इंजिनिअरिंग निर्यात १५ टक्क्यांनी घटून २२.२ अब्ज डॉलर झाली. डिसेंबर २०१५ पासून निर्यात सातत्याने खाली येत आहे.
जागतिक पातळीवरील उदीसीनतेमुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. इंजिनिअरिंग निर्यात संवर्धन परिषदेने (ईईपीसी) दिलेल्या माहितीनुसार निर्यातीतीलउतार असाच कायम राहिला तर चालू आर्थिक वर्षातील निर्यात आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मधील निर्यातीपेक्षा ७३ अब्ज डॉलरनी कमी असेल.
ईईपीसीने सांगितले की चीनचे चलन युआनचे अवमूल्यन झाल्यामुळे भारतीय निर्यातीला मोठा फटका बसेल व भारतीय निर्यात चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत आपले प्रतिस्पर्ध्याचे स्थान गमावेल. देशाच्या एकूण निर्यातीत इंजिनिअरिंग क्षेत्राच्या निर्यातीचा वाटा सगळ््यात जास्त
आहे.
त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने आणि रत्ने व दागिन्यांची निर्यात होते. देशातील एकूण इंजिनिअरिंगनिर्यात युरोपात १७ टक्के तर उत्तर अमेरिकेत १५ टक्के होते. संयुक्त राष्ट्रांचे अर्थतज्ज्ञ (दक्षिण पश्चिम अशिया) नागेश कुमार म्हणाले की शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवता येईल.
देशाच्या इंजिनिअरिंग निर्यातीत घट
देशाची इंजिनिअरिंग निर्यात गेल्या महिन्यात १६ टक्क्यांनी खाली येऊन ५.८ अब्ज डॉलरची झाली. डिसेंबर २०१४ मध्ये ही निर्यात ६.९ अब्ज डॉलरची होती.
By admin | Updated: January 23, 2016 03:40 IST2016-01-23T03:40:38+5:302016-01-23T03:40:38+5:30
देशाची इंजिनिअरिंग निर्यात गेल्या महिन्यात १६ टक्क्यांनी खाली येऊन ५.८ अब्ज डॉलरची झाली. डिसेंबर २०१४ मध्ये ही निर्यात ६.९ अब्ज डॉलरची होती.
