Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनच्या विदेश व्यापारात घट

चीनच्या विदेश व्यापारात घट

चीनच्या विदेशी व्यापारात सलग नऊ महिने घट झाल्याने जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये मंदीचा जोर वाढत असल्याचे दिसते

By admin | Updated: December 8, 2015 23:41 IST2015-12-08T23:41:51+5:302015-12-08T23:41:51+5:30

चीनच्या विदेशी व्यापारात सलग नऊ महिने घट झाल्याने जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये मंदीचा जोर वाढत असल्याचे दिसते

Decreases in China's foreign trade | चीनच्या विदेश व्यापारात घट

चीनच्या विदेश व्यापारात घट

बीजिंग : चीनच्या विदेशी व्यापारात सलग नऊ महिने घट झाल्याने जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये मंदीचा जोर वाढत असल्याचे दिसते. नोव्हेंबरमध्ये चीनच्या विदेश व्यापारात मागील वर्षाच्या तुलनेत ४.५ टक्के घट झाली. या अवधीत चीनचा विदेश व्यापाराचा आकडा ३३७ अब्ज डॉलरवर आला.
या अवधीत ३.७ टक्के घट झाल्याने चीनचा निर्यात व्यापार १,२५० अब्ज युआन आणि आयात व्यापार ५.६ टक्क्यांनी कमी होत ९१० अब्ज युआन इतका झाला. त्यामुळे एकूण व्यापारातील तूट वाढून ३४३.१ अब्ज युआनवर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार वर्षाच्या सुरुवातीच्या ११ महिन्यांत वार्षिक आधारावर विदेश व्यापारात ७.८ टक्के घट झाली. या अवधीत चीनचा विदेश व्यापार २२,०८० युआन एवढा झाला.

Web Title: Decreases in China's foreign trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.