नवी दिल्ली : सोन्याच्या आयातीत गेल्या डिसेंबरमध्ये मोठी घट नोंदली गेली. डिसेंबर २०१४ मध्ये सोन्याची आयात १.३४ बिलियन डॉलरवर आली. गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत यात एक-चतुर्थांश घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये सोन्याची आयात ५.६१ बिलियन डॉलर होती.
तथापि, वार्षिक आधारावर सोन्याच्या आयातीत ७.४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. डिसेंबर २०१३ मध्ये सोन्याची आयात १.२५ बिलीयनवर होती. गेल्या आॅगस्टपासून सोने आयातीत वाढ होत आहे. जुलैमध्ये ३.७५ बिलीयन डॉलरहून आॅगस्टमध्ये सोने आयात २.०३ बिलियन डॉलरवर गेली होती. भारत हा जगातील सर्वांत मोठा सोने आयातदार देश असून याचा देशांतर्गत सराफा उद्योगाची मागणी भागविण्यासाठी वापर केला जातो.
नोव्हेंबर २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने सोने आयातीवर निर्बंध उठवत वादग्रस्त ८०:२० धोरण मागे घेतले होते. चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी आॅगस्ट २०१३ मध्ये सोने आयातीचे ८०:२० धोरण जाहीर करण्यात आले होते. या धोरणांतर्गत नवीन खरेदीपुर्वी सुमारे २० टक्के सोन्याची निर्यात करणे अनिवार्य करण्यात आले होते.
डिसेंबरमध्ये घटली सोन्याची आयात
सोन्याच्या आयातीत गेल्या डिसेंबरमध्ये मोठी घट नोंदली गेली. डिसेंबर २०१४ मध्ये सोन्याची आयात १.३४ बिलियन डॉलरवर आली
By admin | Updated: January 16, 2015 04:54 IST2015-01-16T04:54:16+5:302015-01-16T04:54:16+5:30
सोन्याच्या आयातीत गेल्या डिसेंबरमध्ये मोठी घट नोंदली गेली. डिसेंबर २०१४ मध्ये सोन्याची आयात १.३४ बिलियन डॉलरवर आली
