नवी दिल्ली : अलीकडील काळात शेअर बाजारात झालेल्या घसरणीने यंदा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
शेअर्सच्या विक्रीने मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार मूल्यांकन घटून ९५.४० लाख कोटी रुपये झाले. गुंतवणूकदारांची संपत्ती २.९५ लाख कोटी रुपयांनी घटली.
२०१४ मध्ये सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनाच्या आधारे गुंतवणूकदारांची संपत्ती २८ लाख कोटी रुपयांनी वाढली आणि एकूण बाजार भांडवली मूल्य ९८.३६ लाख कोटी झाले. गेल्या वर्षी एक वेळ गुंतवणूकदारांचे बाजार भांडवल १०० लाख कोटी रुपयांच्या आसपास गेले होते. कंपन्यांचे कमी उत्पन्न आणि जागतिक स्तरावर नकारात्मक धोरणाने गेल्या तिमाहीत बाजारात चढ-उतार होत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०१५ मध्ये आतापर्यंत १,६३५.९२ अंकांनी म्हणजे ५.९४ टक्क्यांनी घसरून २५,८६३.५० अंकांवर आला. ४ मार्च २०१५ रोजी सेन्सेक्सने ३०,०२४.७४ हा सर्वोच्च आकडा गाठला होता. त्यानंतर त्यात घसरण सुरू झाली. आठ सप्टेंबर रोजी वर्षातील सर्वांत कमी स्तरावर म्हणजे २४,८३३.५४ अंकांवर सेन्सेक्स पोहोचला. २४ आॅगस्ट रोजी सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली होती. त्या दिवशी सेन्सेक्स १६२४.५१ अंकांनी घसरला होता. एका दिवसातील ती सर्वात मोठी घसरण होती. त्यामुळे गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान
झाले. चीनमधील मंदी आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. २०१४ मध्ये सेन्सेक्स ६,३२८.७४ अंकांनी म्हणजे ३० टक्क्यांनी वधारला होता.
२००९ नंतर ही सर्वांत वेगवान वृद्धी होती.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटींची घट
अलीकडील काळात शेअर बाजारात झालेल्या घसरणीने यंदा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
By admin | Updated: September 25, 2015 22:15 IST2015-09-25T22:15:44+5:302015-09-25T22:15:44+5:30
अलीकडील काळात शेअर बाजारात झालेल्या घसरणीने यंदा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
