नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहक यांच्या मागणीत सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली गेली. परिणामी ३० रुपयांच्या किरकोळ घसरणीसह सोन्याचा भाव २६,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
दुसरीकडे चांदीचा भावही ३०० रुपयांच्या सुधारणेसह ३६,५०० रुपयांनी वधारला.
बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारात घसरणीचा कल होता. याचा स्थानिक बाजारातील व्यापारी व किरकोळ ग्राहक यांच्यावर दबाव राहिला. परिणामी समभाग बाजारात पर्यायी गुंतवणूक झाली.
सिंगापुरात सोन्याचा भाव कमी होऊन १,१९३.१८ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घट
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहक यांच्या मागणीत सलग दुसऱ्या दिवशी घट
By admin | Updated: November 22, 2014 02:54 IST2014-11-22T02:54:44+5:302014-11-22T02:54:44+5:30
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहक यांच्या मागणीत सलग दुसऱ्या दिवशी घट
