Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाचा निर्णय

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाचा निर्णय

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर असलेले प्रतिटन ३३00 रुपयांचे अनुदान नव्या सरकारनेही कायम ठेवले आहे

By admin | Updated: June 13, 2014 04:12 IST2014-06-13T04:12:33+5:302014-06-13T04:12:33+5:30

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर असलेले प्रतिटन ३३00 रुपयांचे अनुदान नव्या सरकारनेही कायम ठेवले आहे

Decision to subsidize raw sugar exports | कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाचा निर्णय

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाचा निर्णय

नवी दिल्ली : कच्च्या साखरेच्या निर्यातीवर असलेले प्रतिटन ३३00 रुपयांचे अनुदान नव्या सरकारनेही कायम ठेवले आहे. जून आणि जुलै महिन्यांसाठी हा निर्णय असून यामुळे निर्यातीत वाढ होईल असे मत या उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे उसाचे पैसे साखर कारखानदारांना देता यावेत या हेतूने संपुआ सरकारने ही अनुदानाची योजना जाहीर केली होती. २0१३-१४ आणि २0१४-१५ या विपणन वर्षातील साखर निर्यातीसाठी हा निर्णय घेताना फेब्रुवारी-मार्च या महिन्यांकरिता ३३00 रुपये अनुदान मंजूर केले होते. त्याच वेळी याबाबत दर दोन महिन्यांनी आढावा घेण्याचेही निश्चित करण्यात आले होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी हे अनुदान प्रतिटन २ हजार २७७ रुपये ठरविण्यात आले होते. आता ते पुन्हा ३३00 रुपये करण्यात आले आहे.








 

Web Title: Decision to subsidize raw sugar exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.