Lokmat Money > बिझनेस न्यूज > डाळी, बासमती उतरला; साखर महागली

डाळी, बासमती उतरला; साखर महागली

साठा करण्यावर आणलेले निर्बंध व जप्त केलेली डाळ खुल्या बाजारात आणणे असे उपाय सरकारने केल्यामुळे गेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव कमी झाले.

By admin | Updated: January 4, 2016 02:31 IST2016-01-04T02:31:24+5:302016-01-04T02:31:24+5:30

साठा करण्यावर आणलेले निर्बंध व जप्त केलेली डाळ खुल्या बाजारात आणणे असे उपाय सरकारने केल्यामुळे गेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव कमी झाले.

Dali, Basmati landed; Sugar Exponential | डाळी, बासमती उतरला; साखर महागली

डाळी, बासमती उतरला; साखर महागली

नवी दिल्ली : साठा करण्यावर आणलेले निर्बंध व जप्त केलेली डाळ खुल्या बाजारात आणणे असे उपाय सरकारने केल्यामुळे गेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव कमी झाले. शिवाय डाळींची लागवड वाढल्याचे आलेले वृत्त व कमी झालेली मागणी यामुळेही डाळींचे भाव प्रभावित झाले.
सरकारने केलेले विविध उपाय व साठेखोरांकडून जप्त केलेली तूरडाळ खुल्या बाजारात आणल्यामुळे भाव कमी होण्यास मदत झाली. आगामी वर्षातही डाळीचे भाव चढेच राहण्याची शक्यता विचारात घेऊन खाद्यान्न मंत्री रामविलास पासवान यांनी एमएमटीसी व एसटीसी यांना डाळ आयात करण्याची सूचना केली आहे. त्यामुळेही भाव आटोक्यात राहण्यास मदत झाली. राजधानीत गेल्या आठवड्यात तूरडाळ ८ हजार ७०० ते १२ हजार ५०० ते १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होता. याआधीच्या आठवड्यात हाच भाव ९ हजार ते १२ हजार ८०० ते १४ हजार ८०० रुपये होता. मूग डाळीचा भाव (तुकडा) प्रतिक्विंटल ६ हजार ९५० ते ७ हजार ५५० ते ७ हजार ९५० रुपये होता. चांगल्या प्रतीची मूगडाळ ७ हजार ९०० ते ८ हजार ६०० रुपये होती.
साखरेच्या किरकोळ व ठोक विक्रेत्यांची वाढती मागणी व कमी पुरवठा यामुळे या आठवड्यात साखरेचे भाव वाढले. एम ३० व एस ३० साखरेचे भाव या आठवड्यात अनुक्रमे प्रतिक्विंटल ३२०० ते ३४०० व ३१९० ते ३३९० होते. गेल्या आठवड्यात हे भाव ३०६० ते ३२०० व ३०५० ते ३१९० होते.
गुळ स्थिर
फारसा उठाव नसल्यामुळे व पुरेसा साठा असल्यामुळे गुळाचे भाव गेला आठवडाभर स्थिर होते. पण मुजफ्फरनगर व मुरादाबाद गूळ बाजारात मात्र भाव घसरले.

Web Title: Dali, Basmati landed; Sugar Exponential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.