Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदरातील कपात सर्वस्वी महागाईवर अवलंबून -राजन

व्याजदरातील कपात सर्वस्वी महागाईवर अवलंबून -राजन

येणाऱ्या काळात धोरणात्मक व्याजदरांत कपात करावयाची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी महागाईवरच अवलंबून राहील, असे स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. द

By admin | Updated: March 22, 2015 23:59 IST2015-03-22T23:59:46+5:302015-03-22T23:59:46+5:30

येणाऱ्या काळात धोरणात्मक व्याजदरांत कपात करावयाची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी महागाईवरच अवलंबून राहील, असे स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. द

The cut in interest rates will depend entirely on inflation - Rajan | व्याजदरातील कपात सर्वस्वी महागाईवर अवलंबून -राजन

व्याजदरातील कपात सर्वस्वी महागाईवर अवलंबून -राजन

नवी दिल्ली : येणाऱ्या काळात धोरणात्मक व्याजदरांत कपात करावयाची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी महागाईवरच अवलंबून राहील, असे स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले की, सरकार आणि रिझर्व्ह बँकेत कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही.
रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळासमोर चिदंबरम यांचे भाषण आज झाले. या कार्यक्रमानंतर राजन यांनी पत्रकारांना सांगितले की, धोरणात्मक व्याजदरातील कपातीचा निर्णय अनेक घटकांवर अवलंबून असतो. देशांतर्गत किमती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे दर हे यातील महत्त्वाचे घटक आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वातावरण दर कपातीच्या मार्गातील एक अडथळा आहे. तथापि, देशांतर्गत वातावरण त्याही पेक्षा महत्त्वाचे आहे. नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा महागाईवर काय परिणाम होईल, याकडे रिझर्व्ह बँक बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही राजन यांनी म्हटले. अरुण जेटली यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकार आणि रिझर्व्ह बँकेत दुरावा असण्याचे कोणतेच कारण नाही. सरकार रिझर्व्ह बँकेकडून नियमितपणे सल्ला घेत असते. अर्थसंकल्पाआधी आणि नंतरही आम्ही चर्चा करून आढावा घेत असतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)

बँका दरकपात करतील - जेटली
च्रिझर्व्ह बँकेने नुकतीच व्याजदर कपात केली. तथापि, व्यावसायिक बँकांनी दर कपात केलेली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या कपातीचा लाभ ग्राहकांना मिळालेला नाही. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जेटली म्हणाले की, दर कपातीसाठी आम्ही बँकांवर दबाव टाकीत नाही. आम्ही केवळ आशा बाळगतो. आमची आशा नेहमीच योग्य असल्याचे सिद्ध होत आले आहे. यावेळीही असेच होईल. व्यावसायिक बँका व्याजदर कपात करून ग्राहकांना लाभ मिळवून देतील.

Web Title: The cut in interest rates will depend entirely on inflation - Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.