>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - अनुसूचित जाती (SC) व जमातीतील (ST) लघु उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार मुद्रा बँक सुरु करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या बँकेसाठी सुरुवातीला २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शनिवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुद्रा बँकेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. जेटली म्हणाले, भारतात ५ कोटी ७७ लाख लघु उद्योग असून यातील ६६ टक्के उद्योग मागासवर्गीय जाती व अनुसूचीत जमातीतील लोकांचे आहे. या वर्गातील तरुण उद्योजकांना चालना देण्यासाठी मुद्रा बँकेची स्थापना करु. बँकेशी संबंध नसलेल्यांना बँकेशी जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तसेच आर्थिक पाठबळ नसलेल्या उद्योजकांना या बँकेद्वारे आर्थिक मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले.