Lokmat Money > बिझनेस न्यूज > गंगाजळी ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर

गंगाजळी ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर

देशाच्या परकीय गंगाजळीत ६३१.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भर पडून ती १८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर झाली

By admin | Updated: September 25, 2015 22:14 IST2015-09-25T22:14:15+5:302015-09-25T22:14:15+5:30

देशाच्या परकीय गंगाजळीत ६३१.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भर पडून ती १८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर झाली

Cumulative reserves of US $ 352.02 billion | गंगाजळी ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर

गंगाजळी ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर

मुंबई : देशाच्या परकीय गंगाजळीत ६३१.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भर पडून ती १८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ३५२.०२ अब्ज अमेरिकन डॉलर झाली. परकीय चलनाच्या संपत्तीत वृद्धी झाल्यामुळे ही गंगाजळी वाढल्याचे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी निवेदनात म्हटले.
आधीच्या आठवड्यात गंगाजळीत वाढ होण्यास परकीय चलन संपत्तीचा महत्त्वाचा वाटा होता व त्यामुळे त्यात २.३५८ अब्ज डॉलरची भर पडून ती ३५१.३८९ अब्ज अमेरिकन डॉलरची झाली. सोन्याच्या गंगाजळीत मात्र काहीही वाढ न होता ती १८.०३५ अब्ज अमेरिकन डॉलरची राहिली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून पैसे काढण्याचे भारताचे विशेष अधिकार २९.३ दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून ४.०९७ अब्ज अमेरिकन डॉलरवर गेले.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील भारताची ठेव ९.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरने वाढून ती १.३२८ अब्ज अमेरिकन डॉलर झाली, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Cumulative reserves of US $ 352.02 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.