नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावत असलेली आर्थिक समस्या ध्यानात घेता या क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी सामाजिक उत्तरायी निधीतून (सीएसआर) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आर्थिक हातभार लावल्यास या क्षेत्रातील उद्योगांच्या कारभारात वृद्धी होऊ शकते, असे मत पीएच.डी. चेंबर आणि एव्हीयन मीडियाने संयुक्त सर्वेक्षणातून व्यक्त केले आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील बड्या कंपन्यांमधील प्रचलित नवीन तंत्रज्ञान, पद्धत, प्रक्रिया आणि अन्य प्रमुख मानक याविषयीही माहिती मिळेल. तसेच या कंपन्यांची क्षमता आणि एकूण उत्पादकताही यामुळे वाढेल. राष्ट्रीय राजधानी दिल्ली विभागातील ओखला आणि हरियाणातील फरिदाबादस्थित या क्षेत्रातील जवळपास १३० कंपन्यांचा या सर्वेक्षणात समावेश होता. कर्ज समस्या, कुशल मनुष्यबळाचा अभाव, प्रगत तंत्रज्ञान आणि कच्चा माल खरेदीच्या समस्यांना या क्षेत्रातील कंपन्यांना सामोरे जावे लागत आहे. एमएसएमई क्षेत्रातील ५९ टक्के कर्मचारी कुशल आहेत. २१ टक्के प्रशिक्षण घेत असून २० टक्के अकुशल आहेत.
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना होणार सीएसआरचा लाभ
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावत असलेली आर्थिक समस्या ध्यानात घेता या क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी सामाजिक उत्तरायी निधीतून (सीएसआर) सूक्ष्म, लघु
By admin | Updated: March 22, 2016 03:08 IST2016-03-22T03:08:56+5:302016-03-22T03:08:56+5:30
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावत असलेली आर्थिक समस्या ध्यानात घेता या क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी सामाजिक उत्तरायी निधीतून (सीएसआर) सूक्ष्म, लघु
