Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्चे तेल घसरणार २० डॉलरपर्यंत

कच्चे तेल घसरणार २० डॉलरपर्यंत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरणीचा ट्रेन्ड कायम असून सोमवारी तेलांच्या किमतीने प्रति बॅरल ३५ अमेरिकी डॉलरचा

By admin | Updated: December 22, 2015 02:40 IST2015-12-22T02:40:32+5:302015-12-22T02:40:32+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरणीचा ट्रेन्ड कायम असून सोमवारी तेलांच्या किमतीने प्रति बॅरल ३५ अमेरिकी डॉलरचा

Crude oil will fall to $ 20 | कच्चे तेल घसरणार २० डॉलरपर्यंत

कच्चे तेल घसरणार २० डॉलरपर्यंत

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरणीचा ट्रेन्ड कायम असून सोमवारी तेलांच्या किमतीने प्रति बॅरल ३५ अमेरिकी डॉलरचा
नीचांक गाठला. तेलाच्या किमती सरत्या वर्षात सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाल्या असून परिस्थिती जैसे थे राहिल्यास आगामी सहा महिन्यात या किमती प्रति बॅरल २० डॉलरपर्यंत घसरतील असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेने वाढविलेले तेलाचे उत्पादन आणि स्पर्धात्मकतेमध्ये सौदी देशांनी देखील वाढविलेला पुरवठा यामुळे मागणी व पुरवठ्याचे समीकरण विस्कळीत झाल्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात २० डॉलरपर्यंत जर भाव खाली आले तर त्यामुळे तेल उत्खनन-उत्पादन करणाऱ्या देशांतील कंपन्यांना जरी तोटा होणार
असला तरी अनेक देशांतून महागाई कमी होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Crude oil will fall to $ 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.