लंडन : जागतिक बाजारपेठेत मंगळवारी तेलाची किंमत गेल्या पाच वर्षांत प्रथमच ५० डॉलरच्या (अमेरिकन) खाली आली. बळकट झालेला डॉलर, शेअरच्या घटत्या किमती आणि कच्च्या तेलाच्या मुबलक पुरवठ्यामुळे तेल ५० डॉलरपेक्षा खाली उतरले.
२०० पेक्षा जास्त अंकांनी निर्देशांक खाली येणे आणि युरो झोनमधून ग्रीक माघार घ्यायच्या भीतीमुळे युरोपियन शेअर बाजारात दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होताच तेलाच्या किमती एकदम खाली आल्या. दुपारी साडेचारच्या सुमारास एक बॅरल तेलाची किंमत ४९.९५ डॉलरला पोहोचली. हे तेल १ मे २००९ नंतर प्रथमच एवढे स्वस्त झाले. लंडनचे ब्रेंट नॉर्थ सी क्रूड तेल बॅरलला ५२.६६ अमेरिकन डॉलरपर्यंत आले. युरोझोनमधून ग्रीक बाहेर पडल्यास त्याचा परिणाम पश्चिम युरोपबाहेर तेलाची मागणी वाढण्यात होऊ शकतो.
जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव घसरल्यामुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. त्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
४जर्मनीचे राजकीय पुढारी ग्रीक युरोझोनमधून बाहेर पडण्याची चर्चा करीत आहेत, असे विश्लेषक अँथोनी चेंऊंग यांनी सांगितले. न्यूयॉर्क क्रूड आॅईलनंतर शुक्रवारच्या किमतीपासून २.४२ डॉलर कमी होऊन ५०.२७ डॉलरवर आले.
४ब्रेंट क्रूड तेल ३.३३ डॉलरने घटून ५३.०९ डॉलरवर आले. मागणी घटल्यामुळे आणि तेल निर्यात करणाऱ्या देशांनी किमती कमी होत असल्या तरी उत्पादनात घट न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या जूनपासून ५० टक्क्यांनी तेलाच्या किमती घटल्या आहेत.
कच्चे तेल ५० डॉलरच्या खाली
जागतिक बाजारपेठेत मंगळवारी तेलाची किंमत गेल्या पाच वर्षांत प्रथमच ५० डॉलरच्या (अमेरिकन) खाली आली.
By admin | Updated: January 6, 2015 23:41 IST2015-01-06T23:41:51+5:302015-01-06T23:41:51+5:30
जागतिक बाजारपेठेत मंगळवारी तेलाची किंमत गेल्या पाच वर्षांत प्रथमच ५० डॉलरच्या (अमेरिकन) खाली आली.
