नवी दिल्ली : विदेशातील बँकांत ठेवणाऱ्या भारतीयांची नावे आणि त्यांच्या खात्यांची माहिती हाती येण्यासाठी कर चुकवेगिरी हा फौजदारी गुन्हा ठरविण्याची गरज आहे, असे मत केंद्र सरकारने काळ््या पैशाच्या मुद्यावर स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) व्यक्त केले आहे.
एसआयटीचे प्रमुख एम. बी. शाह यांनी म्हटले की, कर चोरी हा फौजदारी गुन्हा ठरविल्यास सध्या विदेशात असलेल्या काळ््या पैशाची माहिती सरकारला मिळेलच. त्याचबरोबर येणाऱ्या पिढ्या असा पैसा ठेवण्यापासून दूर राहतील. सध्या कर चोरीची प्रकरणे दिवाणी न्यायालयात चालविली जातात. भारतात १९६१च्या आयकर कायद्यानुसार करचोरी प्रकरणी गुन्हे नोंदविले जातात. विदेशी चलनाशी संबंधित गुन्हे विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यानुसार (फेमा) हाताळली जातात. हे दोन्ही कायदे दिवाणी स्वरूपाचे आहेत.
‘करचोरी फौजदारी गुन्हा ठरवायला हवा’
विदेशातील बँकांत ठेवणाऱ्या भारतीयांची नावे आणि त्यांच्या खात्यांची माहिती हाती येण्यासाठी कर चुकवेगिरी हा फौजदारी गुन्हा ठरविण्याची गरज आहे,
By admin | Updated: December 15, 2014 03:24 IST2014-12-15T03:24:38+5:302014-12-15T03:24:38+5:30
विदेशातील बँकांत ठेवणाऱ्या भारतीयांची नावे आणि त्यांच्या खात्यांची माहिती हाती येण्यासाठी कर चुकवेगिरी हा फौजदारी गुन्हा ठरविण्याची गरज आहे,
