Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी

डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी

डाळींच्या वाढत्या मागणीमुळे नरेंद्र मोदी सरकार चिंतेत असून, यंदा मोठ्या प्रमाणावर डाळ आयात करावी लागणार आहे. डाळींच्या आयातीवर तब्बल ३0 हजार कोटी रुपयांचा खर्च

By admin | Updated: September 2, 2016 01:27 IST2016-09-02T01:27:04+5:302016-09-02T01:27:04+5:30

डाळींच्या वाढत्या मागणीमुळे नरेंद्र मोदी सरकार चिंतेत असून, यंदा मोठ्या प्रमाणावर डाळ आयात करावी लागणार आहे. डाळींच्या आयातीवर तब्बल ३0 हजार कोटी रुपयांचा खर्च

The cost of importing of dal is about 30 thousand crores this year | डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी

डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

डाळींच्या वाढत्या मागणीमुळे नरेंद्र मोदी सरकार चिंतेत असून, यंदा मोठ्या प्रमाणावर डाळ आयात करावी लागणार आहे. डाळींच्या आयातीवर तब्बल ३0 हजार कोटी रुपयांचा खर्च यंदा होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. २0१५-१६ या वर्षात २५,६१९ कोटींची डाळ आयात करण्यात आली होती, तर त्याआधी २0१४-१५ मध्ये १७,0६३ कोटी रुपये खर्च करून ४६ लाख टन डाळ आयात करण्यात आली होती.
३१ जुलैच्या समाप्तीस डाळींचा शिलकी साठा केवळ ६९ हजार टन इतकाच होता. हा साठा अत्यंत तुटपुंजा समजला जात आहे. तो दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २0१६-१७ या वर्षासाठी १ लाख टन डाळ आयात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २0१७-१८ साठी १ लाख २५ हजार टन, २0१८-१९ साठी दीड लाख टन, २0१९-२0 साठी पावणेदोन लाख टन, तर २0२0-२१ या वर्षासाठी २ लाख टन डाळ आयात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २0१६-१७ या वर्षासाठीच आयातीचा खर्च ३0 हजार कोटी रुपये असेल.

चिंता वाढली
कृषी भवनातील सूत्रांनी सांगितले की, २0१५-१६ या वर्षात डाळींचे उत्पादन फक्त १६.४७ दशलक्ष टन झाले. याउलट मागणी मात्र २१ दशलक्ष टन इतकी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी भवनाच्या चिंता वाढल्या आहेत.

Web Title: The cost of importing of dal is about 30 thousand crores this year