नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळणार आहे. लवकरच त्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकांना महिला अनुकूल स्थलांतरण धोरण बनविण्याची सूचना केली आहे. पती काम करत असलेल्या किंवा आई-वडील राहत असलेल्या ठिकाणी बदल करून घेणे सोयीचे ठरावे या उद्देशाने मंत्रालयाने धोरण ठरविण्याबाबत सूचना केली आहे.
महिला कर्मचाऱ्यांची कमीत कमी गैरसोय व्हावी यावर या धोरणात भर दिला जाणार आहे. या उद्देशाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बदली आणि पोस्टिंग धोरण बनविले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अविवाहित किंवा विवाहित महिला कर्मचारी त्यांचे आई-वडील किंवा पती यांच्यापासून पोस्टिंग किंवा बदली झाल्यास त्यांची मोठी असुविधा होते. यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असे मंत्रालयाला दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ही नोटीस काढली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नवे नियम लागू झाल्यानंतर दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या अशा प्रकरणांचाही सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी विचार होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महिला कर्मचारी संघटनांकडून या संदर्भात मागणी केली जात आहे. धोरण तयार करण्यास सांगितल्याने यादृष्टीने सकारात्मक संकेत मिळत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बँकेतील महिलांना सोयीची बदली
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळणार आहे. लवकरच त्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
By admin | Updated: August 18, 2014 02:40 IST2014-08-18T02:40:02+5:302014-08-18T02:40:02+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळणार आहे. लवकरच त्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
