Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटीसीएलवर विस्त्राचा ताबा

आयटीसीएलवर विस्त्राचा ताबा

भांडवली बाजारातील विविध गुंतवणूक योजना व रोखे आदी संदर्भात कॉर्पोरेट ट्रस्ट म्हणून काम करणाऱ्या ‘आयएल अँड एफएस ट्रस्ट कंपनी लि.’ (आयटीसीएल) या कंपनीचा ताबा याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 03:12 IST2016-04-20T03:12:52+5:302016-04-20T03:12:52+5:30

भांडवली बाजारातील विविध गुंतवणूक योजना व रोखे आदी संदर्भात कॉर्पोरेट ट्रस्ट म्हणून काम करणाऱ्या ‘आयएल अँड एफएस ट्रस्ट कंपनी लि.’ (आयटीसीएल) या कंपनीचा ताबा याच

Control over the ITCL | आयटीसीएलवर विस्त्राचा ताबा

आयटीसीएलवर विस्त्राचा ताबा

मुंबई : भांडवली बाजारातील विविध गुंतवणूक योजना व रोखे आदी संदर्भात कॉर्पोरेट ट्रस्ट म्हणून काम करणाऱ्या ‘आयएल अँड एफएस ट्रस्ट कंपनी लि.’ (आयटीसीएल) या कंपनीचा ताबा याच क्षेत्रात आंतररष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ‘विस्त्रा ग्रुप’ने घेतला आहे.
विस्त्रा समुहाने आयटीसीएल कंपनीचा ताबा घेत आपला भारतातील वावरही वाढविला आहे. या ताबा प्रक्रियेनंतर आयटीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नविता यादव या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत.
झपाट्याने विकसित होणाऱ्या भारतीय बाजारात प्रवेश करत आमच्या सेवेचा विस्तार करण्याची आमची इच्छा होती व या व्यवहारांतर्गत ती पूर्ण झाली आहे. आयटीसीएल एक अत्यंत विश्वासार्ह व व्यावसायिक पद्धतीने चालणारी कंपनी असून यामुळे भारतात उत्तम व गुणात्मक सेवा देण्यास आम्हाला मदत होईल अशी प्रतिक्रिया, विस्त्रा ग्रुुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन क्रॉफर्ड यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Control over the ITCL