नवी दिल्ली : आभूषण विक्रेत्यांची लग्नसराईच्या काळातली मागणी व जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव आणखी १०० रुपयांनी वाढून २८,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदली गेली.
औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीत वाढ झाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी वधारून ३९,२०० रुपये प्रतिकिलो झाला.
जागतिक पातळीवर लंडन येथे सुरुवातीच्या व्यवहारात सोने ०.८३ टक्क्यांच्या तेजीसह १,२९०.९० डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ०.७९ टक्क्याने वाढून १७.९२ डॉलर प्रतिऔंस झाला.
तयार चांदीचा भाव १०० रुपयांच्या तेजीसह ३९,२०० रुपये प्रतिकिलो व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ११० रुपयांनी वाढून ३९,१८० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वधारून खरेदीकरिता ६४,००० रुपये व विक्रीसाठी ६५,००० रुपये प्रतिशेकड्यावर राहिला.
४राजधानी दिल्लीच्या बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,१८० रुपये व २७,९८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सोन्याच्या भावात ७६० रुपयांची वाढ झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १०० रुपयांनी वाढून २४,००० रुपयांवर राहिला.
सराफ्यात तेजीचा सिलसिला कायम
दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव आणखी १०० रुपयांनी वाढून २८,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदली गेली.
By admin | Updated: January 21, 2015 00:06 IST2015-01-21T00:06:10+5:302015-01-21T00:06:10+5:30
दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव आणखी १०० रुपयांनी वाढून २८,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदली गेली.
