लंडन : चीन हा मोठा देश असून तेथील प्रत्येक घडामोडींचा परिणाम पडणे स्वाभाविक आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले. ते बीबीसीच्या ‘इंडिया बिझनेस रिपोर्ट’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
चीनचा शेअर बाजार जोरात कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचेही मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजन बोलत होते. अडचणींतून प्रवास करीत असलेल्या अर्थव्यवस्थांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या त्यांच्या केंद्रीय बँकांवर दडपण आणण्याबद्दल त्यांनी इशारा दिला.
चीनसमोरील आर्थिक संकट अधिक वाढल्यानंतर सोमवारी तेथील शेअर बाजार ८ टक्क्यांपेक्षाही जास्त कोसळला व त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्स १७०० अंकांनी खाली आला.
चीनच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना राजन यांनी सांगितले की, ‘‘वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या आकड्यांबद्दल अनिश्चितता आहे. आकडे अजून समोर यायचे आहेत. चीन हा मोठा देश असून जागतिक अर्थव्यवस्थेसाठी त्याचे फार मोठे महत्व आहे.’’
जगातील कोणत्याही ठिकाणच्या प्रतिकूल घटनेचा परिणाम जगात इतरत्र होतोच. आधी तो शेअर बाजारावर व नंतर व्यापारावर होतो. त्यामुळे प्रत्येक जण याबद्दल काळजीत आहे. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी चीनला जबाबदार ठरविताना सावधगिरी बाळगायला हवी, असे ते म्हणाले.
दरम्यान, या आधी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी चीनमधील मोठ्या घडामोडी या काही भारतासाठी काळजीच्या नाहीत, असे म्हटले होते.
दुसरे आर्थिक संकट येऊ पाहात आहे का, असे विचारता रघुराम राजन म्हणाले की, आतापर्यंत मला जे दिसले त्यावरून आपण आणखी एका संकटाच्या काठावर येऊन उभे ठाकलो आहोत, असे समजायचे कारण नाही. तरीही ज्या अस्थिर गोष्टी तयार होत आहेत त्याबद्दल आम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थांना सुधारण्याची जबाबदारी केंद्रीय बँकांवर टाकणेही योग्य नाही, असेही ते स्पष्टपणे म्हणाले. आर्थिक प्रश्नांना केवळ सुधारणांद्वारेच उत्तरे मिळू शकतात. केंद्रीय बँकांच्या कारभारात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप केल्यास चांगल्याऐवजी वाईट जास्त घडते, असे राजन म्हणाले.
भारताने वेगाने प्रगती करीत असला तरीही त्याला जागतिक अर्थव्यवस्थेचे वाहन बनण्यासाठी चीनची जागा घ्यायला ‘खूप वेळ लागेल’, असे ते म्हणाले. चीनच्या आकारमानाचा विचार केला तर भारत त्याच्या एक चतुर्थांश किंवा एक पंचमांश एवढाच आहे.
उद्या आम्ही जरी विकास दरात चीनला मागे टाकले तरी त्याचा प्रभाव खूप दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमी असेल. जागतिक बँकेकडे असलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे सकल देशी उत्पादन (जीडीपी) १७,००० हजार डॉलर, चीनचे १० हजार डॉलर तर भारताचे २,००० डॉलर आहे.
चीनमधील घडामोडींचा परिणाम अटळ - राजन
चीन हा मोठा देश असून तेथील प्रत्येक घडामोडींचा परिणाम पडणे स्वाभाविक आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले. ते बीबीसीच्या ‘इंडिया बिझनेस रिपोर्ट’ला दिलेल्या
By admin | Updated: August 27, 2015 01:31 IST2015-08-27T01:31:54+5:302015-08-27T01:31:54+5:30
चीन हा मोठा देश असून तेथील प्रत्येक घडामोडींचा परिणाम पडणे स्वाभाविक आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले. ते बीबीसीच्या ‘इंडिया बिझनेस रिपोर्ट’ला दिलेल्या
