सचालक प्रकाश घुगेंची मनोज बुरकुलला धक्काबुक्की : भूखंड विक्रीतून मिळणार २६ कोटीनाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गंगापूररोडवरील संस्थेच्या मालकीची ४४ गुंठे जागा विक्री करण्याचा निर्णय बहुमताने आवाजी पद्धतीने मंजूर करण्यात आला. या भूखंड विक्रीला मनोज बुरकुल यांनी विरोध दर्शविल्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर संचालक प्रकाश घुगे यांनी बुरकुलला केलेल्या धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे सभेत काही वेळ गोंेधळ निर्माण झाला होता.दरम्यान, या भूखंड विक्रीवरून सभेत काही आजी-माजी संचालकांनी मते नोेंदवित आवश्यक ती काळजी घेऊन भूखंड विक्रीबाबत सहमती दर्शविली. डोंगरे वसतिगृहाजवळील संस्थेच्या इमारतीत या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सरचिटणीस हेमंत धात्रक मागील सभेचे इतिवृत्त व वार्षिक अहवालाचे वाचन केले. सभा कायदेशीर आहे काय? अशी विचारणा पंढरीनाथ थोरे यांनी केली, तर माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांनी वार्षिक अहवालात पान नं ०३ सह अन्य काही पानांवर घोडचुका असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. दिघोळे यांनीही वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येत नाही, फार तर विशेष सभा म्हणून ही सभा घेता आली असती, असे सांगत संचालक मंडळावर ताशेरे ओढले. लक्ष्मण सांगळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त देताना माजी अध्यक्षांचे नाव कसे? अशी विचारणा केली. त्यावर अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी उपस्थितांनी केलेल्या सूचनांनुसार चुका टाळून वार्षिक अहवालात दुरुस्ती केली जाईल, मात्र हा अहवाल मागील संचालक मंडळाचाच असल्याकडे लक्ष वेधले. वार्षिक अहवालातील विषय क्रमांक चारच्या सर्वे नं-७१७ अ (१) वरील ४० गुंठे भूखंड विक्रीच्या विषयाची सविस्तर माहिती अध्यक्ष कोेंडाजी आव्हाड यांनी दिली. संस्थेवर आजमितीस सुमारे २६ कोटींचे कर्ज असून, उत्पन्न मात्र दरवर्षी सव्वा कोटीच्या घरात जात आहे. त्यामुळे संस्थेचा खर्च कमी करण्यासाठी ९ कर्मचार्यांचे राजीनामे घेतले. आणखी अतिरिक्त ठरत असणारी ८५ शिक्षक व कर्मचार्यांनाही कमी करण्यात येणार असल्याचे सांगत संस्थेच्या ११ शाळांना अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी शासनाकडे फेर मूल्यांकनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र रोस्टरप्रमाणे आदिवासी शिक्षकांची भरती आवश्यक असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)
भूखंड विक्रीवरून गोंधळ; आवाजी मतदानाने ठराव संमत
संचालक प्रकाश घुगेंची मनोज बुरकुलला धक्काबुक्की : भूखंड विक्रीतून मिळणार २६ कोटी
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:07+5:302014-12-20T22:27:07+5:30
संचालक प्रकाश घुगेंची मनोज बुरकुलला धक्काबुक्की : भूखंड विक्रीतून मिळणार २६ कोटी
