>प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)
बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत राज्यात राबविल्या जाणा:या रेशीमविषयक अनेक योजनांचा प्रकल्प खर्च व अनुदान मर्यादेत यंदा भरीव वाढ केली आहे. शिवाय रेशीम उद्योगातील शेतकरी, कामगार, पीक व संगोपनगृहांसाठी विमा योजनाही मंजूर करण्यात आली आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक बाबींसाठी शेतक:यांना 1क्क् टक्के अनुदान दिले जाणार आहे. शासनाने मंजुरी अध्यादेश जारी केल्याने शेतकरी रेशीम शेतीकडे वळण्याची शक्यता आहे.
रेशीम उद्योगाचा प्रकल्प खर्च सुधारित योजनांतर्गत अंडीपुंज निर्मिती, दर्जावाढ, खासगी अंडीपुंज निर्मिती केंद्रांना साह्य, टसर बीजगुणन साहित्य वाढ, टसर कोष साठवणूक गृहबांधणी, टसर साठवणुकीसाठी शेतक:यांना मदत, तुती लागवड साह्य, पाणी देण्याच्या सुविधा, कीटक संगोपन साहित्य पुरवठा, जैविक निविष्ठा निर्मिती, सुधारित कॉटेज बेसिन रिलिंग केंद्र उभारणी, यांत्रिकीकरण, धागा रंगवणो, बाजारपेठ उभारणी या साठीच्या प्रकल्प खर्चात वाढ करण्यात आली आहे. यामुळे लाभाथ्र्याना मिळणा:या अनुदानाच्या प्रमाणातही वाढ होईल़ रेशीम शेतीलाही विमा संरक्षण देताना विमा योजनेत दोन प्रकार पाडण्यात आलेत़ यात आरोग्य विम्याच्या माध्यमातून शेतक:यांसाठी चांगली सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आल़े आरोग्य विम्यासाठी रेशीम शेतीतील शेतकरी व कामगारांची हप्त्यापोटी 95 टक्के रक्कम राज्य व केंद्र सरकार भरणार आहे. शेतक:यांना केवळ पाच टक्के विमा हप्त्याची रक्कम भरायची आह़े यात त्यांच्या पाच जणांच्या कुटुंबाला 3क् हजार रुपये मर्यादित सर्व आजार, बाळंतपण, दात, डोळा यावरील उपचार तसेच लहान मुलांवरील 1क् हजार रुपयांर्पयतचे उपचार करण्यात येणार आहे. या योजनेचा शेतक:यांना नक्कीच फायदा होणार असून, रेशीम शेतीची वाढ शक्य आह़े
रेशीम उद्योगाबाबत शेतक:यांच्या फायद्याच्या अनेकविध योजना आहेत़ इच्छुक शेतक:यांनी या क्षेत्रत लक्ष घालून प्रगती साधली पाहिजे. आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष शेतक:यांनी भेट दिल्यास त्यांना सविस्तर मार्गदर्शन व योजनांबाबत योग्य माहिती देताना आम्हाला आनंद होईल, अशी माहिती वर्धा येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनय पौनीकर यांनी दिली.
4रेशीम संसाधन केंद्र उभारणी, जड पाणी हलके करणो, खराब पाणी शुद्धीकरण, न्यूमॅटिक लिफ्टिंग संयत्र पुरवठा, मोटार व सौर ऊज्रेवर चालणारे कताई यंत्र, टसर कोष निवड यंत्र, खेळत्या भांडवलावर अनुदान, स्वयंचलित डय़ुपिऑन रिलीन युनिट उभारणी, क्षेत्र वाढ, शेड बांधकाम, गांडूळ खत निर्मिती, रोप निर्मिती, टसरसाठी चॉकी बाग विकास व शेतकरी रोपवाटिका, अंडीपुंज केंद्र उभारणी, फिरते बीज तपासणी व रोग नियंत्रण सुविधा, रेशीम फार्म बळकटीकरण यासाठी यंदापासून नवीन योजना राबविल्या जात आह़े
4यासाठी प्रकल्प खर्च मर्यादाही निश्चित करण्यात अली असून 1क्क् टक्क्यांर्पयत अनुदान देऊ करण्यात आल्याने रेशीम शेती व उद्योगाकडे नव्या पिढीतील शेतकरी वळण्याची शक्यता आह़े
4शेतीमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणा:या शेतक:यांच्या नुकसानीला संरक्षण देण्यासाठी चार प्रकारात पीक विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात मल्टिव्होल्टाईन मलबेरी (शुद्ध व संकरित), बायव्हाल्टाईन मलबेरी टसर पहिले, दुसरे व तिसरे पीक आणि तुती कीटक संगोपनगृह यांचा समावेश आहे.