नवी दिल्ली : फेब्रुवारी २0१६ हा महिना वाहन विक्रीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहिला. या महिन्यात मारुती, एस्कॉर्टस् या काही कंपन्या वगळता उर्वरित कंपन्यांची वाहन विक्री वाढली.
हिंदुजा समूहाच्या अशोक लेलँडची फेब्रुवारीत विक्री २५ टक्क्यांनी वाढून १३,४0३ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १0,७६२ वाहनांची विक्री केली होती. चालू वर्षी महिन्याच्या मधल्या काळात जड आणि व्यावसायिक वाहनांची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली. या काळात १0,७९८ वाहनांची विक्री झाली. याच महिन्यात देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुतीची विक्री किरकोळ घटली. गेल्या वर्षी फेब्रुवारीत मारुतीच्या १,८१,५५१ कारची विक्री झाली होती. ती चालू वर्षी फेब्रुवारीत १,१७,४५१ इतकी झाली. विशेषत: आॅल्टो, वॅगन आर आदी क्षेत्रात विक्री ११.२ टक्क्यांनी घटून ३५,४९५ इतकी झाली. रॉयल एनफिल्डच्या दुचाकींची विक्री फेब्रुवारीत तब्बल ६३ टक्क्यांनी वाढली.
फेब्रुवारीमध्ये वाहन क्षेत्रात संमिश्र कल
फेब्रुवारी २0१६ हा महिना वाहन विक्रीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहिला. या महिन्यात मारुती, एस्कॉर्टस् या काही कंपन्या वगळता उर्वरित कंपन्यांची वाहन विक्री वाढली.
By admin | Updated: March 2, 2016 02:43 IST2016-03-02T02:43:52+5:302016-03-02T02:43:52+5:30
फेब्रुवारी २0१६ हा महिना वाहन विक्रीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहिला. या महिन्यात मारुती, एस्कॉर्टस् या काही कंपन्या वगळता उर्वरित कंपन्यांची वाहन विक्री वाढली.
