नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांद्वारा मर्यादित व्यवहार झाल्याने सोन्याचा भाव २६,३५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर कायम राहिला. दुसरीकडे औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी कमजोर झाल्याने चांदीचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह ३५,९५० रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, किरकोळ विक्रेते व आभूषण निर्मात्यांनी खरेदीत हात आखडता घेतला. भाव आणखी घसरण्याच्या भीतीने त्यांनी खरेदी कमी केली. याचा परिणाम होऊन मागणीला आळा बसला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हद्वारा व्याजदर वाढीची चर्चा असतानाच सिंगापुरात सोन्याचा भाव चार महिन्यांची नीचांकी पातळी ११६५.७० डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव एक टक्क्याने घटून १५.९८ डॉलर प्रतिऔंस राहिला. स्थानिक बाजार धारणेवर याचा नकारात्मक परिणाम झाला.
तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन ३५,९५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. दुसरीकडे सट्टेबाजांच्या मागणीने चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६०० रुपयांच्या तेजीसह ३५,९५० रुपये प्रतिकिलो झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी घटून खरेदीसाठी ५९,००० रुपये व विक्रीसाठी ६०,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सराफा बाजारात संमिश्र कल
जागतिक बाजारातील कमजोर पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांद्वारा मर्यादित व्यवहार झाल्याने सोन्याचा भाव २६,३५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर कायम राहिला
By admin | Updated: November 5, 2014 03:50 IST2014-11-05T03:48:27+5:302014-11-05T03:50:31+5:30
जागतिक बाजारातील कमजोर पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांद्वारा मर्यादित व्यवहार झाल्याने सोन्याचा भाव २६,३५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर कायम राहिला
