वाणिज्य पा ...४
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:18+5:302015-01-22T00:07:18+5:30

वाणिज्य पा ...४
>फोटो आहे.... एच/डेली/चामट ....विठ्ठलराव चामट स्मृती संस्थेचा समारंभनागपूर : विठ्ठलराव चामट स्मृती सेवा संस्थेचा त्रिदशकपूर्ती समारंभ आणि शालेय वस्तूचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच झाले. मंचावर खा. कुपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, माजी खासदार गेव्ह आवारी, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी गायधने, नगरसेविका गवरे, सारिका नांदूरकर, संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर चामट, जि.प.चे माजी अध्यक्ष विठ्ठल टालाटुले, माजी सभापती अजय बोढारे उपस्थित होते. बावनकुळे यांनी संस्थेच्या प्रगतीची प्रशंसा केली आणि विद्यालयाचे नाव देशस्तरावर नेतील, असे विद्यार्थी तयार करण्याचे आवाहन केले. शैक्षणिक अडचणी दूर करण्यास मदत करण्यास मदत करू. प्रगतीसाठी संस्था आणि मुख्यध्यापकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. पाहुण्यांनी संस्थेच्या प्रगतीची प्रशंसा केली. आभार विमल लेंडे यांनी मानले. यावेळी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.