वाणिज्य पा ...१ ...
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:01+5:302015-02-18T00:13:01+5:30

वाणिज्य पा ...१ ...
>फोटो आहे... रॅपमध्ये ...तनिष्कमध्ये हिऱ्यांचे प्रदर्शननागपूर : हिऱ्याचे मूल्यांकन करण्याची सुविधा स्वत:कडेच उपलब्ध असलेल्या काही ज्वेलर्सपैकी तनिष्क एक आहे. तनिष्कने हिऱ्याचे दागिने परवडणाऱ्या किमतीत २५ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध केले आहेत. जवळपास १८२ पेक्षा जास्त आकर्षक व अनोखे हिऱ्याचे दागिने प्रदर्शित केले असून ऑनलाईन २० हजारांपेक्षा जास्त दागिने पाहण्याची सुविधा आहे. हिऱ्याचे दागिने खरेदीच्या टीप्सचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय हिऱ्यांच्या तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तनिष्कने खास महिलांसाठी विशेष प्रकारचे हिऱ्याचे दागिने विक्रीस सादर केले आहेत. भारतीय महिलांच्या आवडीनुसार डिझाईन्स अनोखे आहेत. ते महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारे आहेत. तनिष्क ज्वेलरी हा टाटा समूहाचा उपक्रम आहे. अनुभवी कारागिरांतर्फे अनोखे आणि उत्तम गुणवत्तेचे खात्रीलायक दागिने तयार केले जातात. तनिष्कतर्फे गोल्ड आणि सेमी गोल्ड दागिने जवळपास ५ हजार पारंपरिक, पाश्चिमात्य आणि मिश्र लूकमध्ये प्रदर्शित केले आहेत. दागिन्यांची निर्मिती स्टेट ऑफ आर्ट कारखान्यात आधुनिक उपकरणे आणि सामग्रीने केली जाते. तनिष्कचे ८६ शहरांत १६६ एक्सक्ल्युझिव्ह बुटिक असून देशातील पहिली आणि मोठी ज्वेलरी रिटेल स्टोअर चेन आहे. तनिष्क स्टोअर स्टेशन रोड आणि धरमपेठ येथेे आहे.