Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य प˜ा ...१ ...

वाणिज्य प˜ा ...१ ...

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30

Commercial address ... 1 ... | वाणिज्य प˜ा ...१ ...

वाणिज्य प˜ा ...१ ...

>गृह फायनान्सच्या नफ्यात वाढ
नागपूर : एचडीएफसीची सहयोगी कंपनी गृह फायनान्स लिमिटेडला (गृह) ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपलेल्या तिमाहीत करपश्चात नफा गेल्या वर्षीच्या १०३.३६ कोटींच्या तुलनेत २६ टक्के वाढ होऊन १२९.७४ कोटी रुपये झाला आहे. ३१ डिसेंबरला कर्जखात्यावर गेल्यावर्षीच्या ६५४४.६० कोटींच्या तुलनेत यावर्षी ८३८२.४३ कोटींचा व्यवहार असल्याने २८ टक्के वाढ नोंदविली गेली. कर्जवाटपात २३ टक्के वाढ झाली. ही वाढ १८२४.७४ कोटींच्या तुलनेत २२४८.४० कोटींवर गेली आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत कर्जवाटप १४३४२ कोटींचे होते. एकूण एनपीए ४८.१७ कोटी किंवा ०.५७ टक्के होता. एकूण थकीत कर्जे ८३८२.४३ कोटी आहेत. मान दूरदर्शीपणाचा उपाय म्हणून गृहने आवश्यकतेपेक्षा जास्त तरतूद केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ३१ डिसेंबर २०१४ रोजी नेट एनपीए ५.५० कोटी झाला आहे. जो कर्जाबाबतचा नेट एनपीए ०.०७ टक्के असे दाखवितो. गृहचा ठेवींचा पोटफोलिओ गेल्या वर्षीनुसार ९२६.९४ कोटींवरून १२८१.१२ कोटी पर्यंत वाढलेला आहे. गृहच्या मुदतबंद ठेवींच्या कार्यक्रमास क्रिसिलने एफएएए असा दर्जा दिलेला असून इक्राने एमएएए दर्जा दिलेला आहे. एफएएए आणि एमएएए या श्रेणी व्याज आणि ठेवी यांच्या परतफेडीविषयी उच्च सुरक्षितता निर्देशित करतात. गृहच्या कमर्शियल पेपर सीपीला क्रिसिलने पी १ आणि अपरिवर्तनीय रोख्यांना एनसीडी आयसीआरएकडून एए++ श्रेणी मिळालेली आहे. गृह फायनान्सच्या देशातील ८ राज्यांमध्ये १५३ कार्यालयांचे नेटवर्क आहे. गुजरातमध्ये ४४, महाराष्ट्रात ४३, कर्नाटकमध्ये १७, मध्य प्रदेशात २३, राजस्थानात ११, छत्तीसगडमध्ये ७, तामिळनाडूमध्ये ७ आणि उत्तर प्रदेशात १ अशी गृहची कार्यालये आहेत.

Web Title: Commercial address ... 1 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.