Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य वार्ता- अपोलो व्हिक्टर

वाणिज्य वार्ता- अपोलो व्हिक्टर

अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

By admin | Updated: September 2, 2014 22:40 IST2014-09-02T22:40:48+5:302014-09-02T22:40:48+5:30

अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

Commerce Talks - Apollo Victor | वाणिज्य वार्ता- अपोलो व्हिक्टर

वाणिज्य वार्ता- अपोलो व्हिक्टर

ोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
मडगाव : अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये एक 22 वर्षीय युवत छातीत वेदना होत असल्याची तक्रार घेऊन दाखल झाला. त्याच्या छातीचे सीटी स्कॅन केले असता छातीच्या मध्यभागी हृदयाच्या वरच्या भागात आणि रक्तवाहिन्या आणि थोरॅसिक कॅव्हिटीच्या दरम्यान मांसल भागास जखम झाल्याचे निदान झाले.
पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करायची झाल्याचे छाती फाडून हा येथे उपचार केले गेले असते. मात्र, अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमधील जनरल आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. अभय खडके यांनी लॅपरोस्कोपिक (की-होल सर्जी) तंत्रज्ञानाच्या साह्यो उपचार केले आणि हृदय, फुफ्फुसे आणि प्रमुख रक्तधमन्यांच्या कार्यात कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घेतली. या शस्त्रक्रियेमध्ये फारच कमी प्रमाणात रक्तस्राव झाला आणि रुग्ण लवकर बराही झाला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी रुग्णाने सामान्य आहार घेतला आणि तिसर्‍या दिवशी रुग्णास घरी जाऊ देण्यात आले.
अशा दुर्मीळ समस्यांबरोबरच अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स, पित्ताशय खडे, हर्निया, आतड्यांचा कर्करोग आदी समस्यांसह स्थुलपणाबाबतची बॅरियाट्रिक सर्जरीचे उपचारही केले जातात.

Web Title: Commerce Talks - Apollo Victor