Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य - मारुती सुझुकीचा महोत्सव आजपासून

वाणिज्य - मारुती सुझुकीचा महोत्सव आजपासून

साईज ८ बाय २.....

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:23+5:302015-02-06T22:35:23+5:30

साईज ८ बाय २.....

The commerce - Maruti Suzuki Festival from today | वाणिज्य - मारुती सुझुकीचा महोत्सव आजपासून

वाणिज्य - मारुती सुझुकीचा महोत्सव आजपासून

ईज ८ बाय २.....

नागपूर : प्रवासी कार उत्पादन क्षेत्रातील आघाडीची मारुती सुझुकी इंडिया कंपनी ग्राहकांच्या फायद्यासाठी पुन्हा एका महा एक्स्चेंज महोत्सव घेऊन आली आहे. यामुळे ग्राहकांना गेल्या डिसेंबरप्रमाणेच स्वत:चा लाभ करून घेण्याची संधी आहे. हा महोत्सव ७ व ८ फेब्रुवारी रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
महा एक्स्चेंज महोत्सव सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. जेथे-जेथे महोत्सव आयोजित केला जातो तेथे-तेथे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. गेल्या डिसेंबरमध्ये महोत्सवाचा लाभ घेण्याची संधी गमावलेल्या नागपूरच्या ग्राहकांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे. महोत्सवात कार बुकिंगवर आकर्षक ऑफर्स आहेत. याशिवाय कंपनीच्या ग्राहकांना त्यांच्या जुन्या कारची उत्तम किंमत दिली जाणार आहे. प्रत्येक स्पॉट बुकिंगवर ५००० रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर जिंकण्याची संधी राहणार आहे. याशिवाय महोत्सवाच्या दोन दिवसांत विविध प्रकारचे खेळ व उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महोत्सवात पहिल्यांदाच रिट्झ कारवर ७७ हजार, व्हॅगन आर, आल्टो ८०० व स्वीफ्ट कारवर ५२ हजार, डिझायरवर ४७ हजार तर, इर्टिगा कारवर ५२ हजार रुपयांची बचत करता येणार आहे. अधिक माहितीसाठी सेवा, आर्या कार्स, आर्या सेंट्रल व ऑटोमोटिव्ह या अधिकृत डीलर्सकडे संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

Web Title: The commerce - Maruti Suzuki Festival from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.