Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य वृत्त २

वाणिज्य वृत्त २

प्रांजल वराडे गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:29+5:302015-01-31T00:34:29+5:30

प्रांजल वराडे गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

Commerce circle 2 | वाणिज्य वृत्त २

वाणिज्य वृत्त २

रांजल वराडे गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
नागपूर : शहरातील प्रतिष्ठित संस्था आयकॅडची विद्यार्थिनी प्रांजल वराडे हिची इंटरनॅशनल युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडसाठी निवड झाली आहे. प्रांजल हिच्यासह एका मुलीची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात सहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र स्पर्धेचे निकष पाहता सहापैकी केवळ दोनच विद्यार्थी यासाठी पात्र ठरू शकले. या निवडीबद्दल आयकॅडचे सीईओ सारंग उपगन्लावार आणि अकेडेमिक्स विभागाचे संचालक डॉ. दिलीप वैद्य यांनी प्रांजलचा सत्कार केला.
प्रांजल ही टीम आयकॅड आणि शहरातील ज्येष्ठ गणिततज्ज्ञ आणि आयकॅडचे सल्लागार डॉ. अनिल कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. ऑलिम्पियाड दर्जाच्या स्पर्धेसाठीची निवड प्रक्रिया अतिशय अवघड असते. यात विद्यार्थ्यांना विविध दर्जाच्या निवड प्रक्रियेतून जावे लागते. आरएमओ ही राज्यस्तरीय परीक्षा, एचबीसीएसई ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था ही परीक्षा घेते. यातून ४०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यंदा प्रांजलसह आयकॅडचे रुपांशू गणवीर, अमेय प्रभुणे, अनुराग भारद्वाज आणि पीयुष वरयानी पात्र ठरले. २०१४ मध्ये आयकॅडच्या सहा विद्यार्थ्यांनी हा टप्पा यशस्वीपणे पार पाडला होता. प्रांजलने मुंबईत होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संस्थेत आंतरराष्ट्रीय ऑल्मिपियाडच्या तयारीचे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षण वर्गात देशतील ३० बुद्धिमान व्यक्तींचा समावेश होता.

Web Title: Commerce circle 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.